BB17 : ‘मला स्वतःचीच लाज वाटू लागली, सतत…’, सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल असं काय म्हणाली अंकिता लोखंडे?

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यामधील 'ती' खासगी गोष्ट समोर येऊ नये म्हणून अभिनेत्री करत होती प्रयत्न पण...., सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्यावर अंकिता लोखंडे हिचं मोठं वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा...

BB17 : 'मला स्वतःचीच लाज वाटू लागली, सतत...', सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल असं काय म्हणाली अंकिता लोखंडे?
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 10:09 AM

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘बिग बॉस 17’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून खेळत आहे. पण अभिनेत्री बिग बॉसच्या घरात कायम दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना दिसते. आता देखील अंकिता हिने सुशांत याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अंकिता हिने ईशा हिच्यासोबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सुशांत याच्यासोबत जेव्हा माझं ब्रेकअप झाले तेव्हा मला कोणाला काहीही सांगायचं नव्हतं. आम्ही पुन्हा एकत्र येऊ अशी अपेक्षा मला होती. पण अशा गोष्टी पब्लिक डोमेन होतात (चर्चेत येतात). असं झाल्यास नातं कायमचं तुटतं. म्हणून मी कधीच कोणासोबत आमच्या नात्याबद्दल बोलली नाही. पण तरी देखील आमच्या नात्याची चर्चा होऊ लागली…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मुनव्वर याला देखील माझ्यासारखं कायमचं वेगळं होण्याची भीती सतावत आहे. तेव्हा मी माध्यमांसोबत बोलायचे, त्यांना सांगायचं, सुशांत आणि मी एकत्र आहोत… आम्ही डेट करत आहोत… पण माझी मलाच लाज वाटत होती. माझ्यासोबत असं काय होत आहे… माझं नातं तुटत आहे.. माझ्यासाठी हे कधीच सोपं नव्हतं…’ असं देखील अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात म्हणाली.

सुशांत पुन्हा येईल असं मला वाटायचं… अंकिता लोखंडे

‘मला सुशांत याच्यापासून कधी वेगळं व्हायचं नव्हतंच.. आम्ही सात वर्ष एकत्र होतो. सुशांत याने पुन्हा घरी यावं असं मला वाटत होतं. जेव्हा सुशांत माझ्या आयुष्यातून गेला, तेव्हा मी पूर्णपणे कोलमडली होती. विकी याच्यामुळे मी आयुष्यातील कठीण परिस्थितीचा सामना करु शकली. विकी याला अनेक टोमणे ऐकावे लागले. पण त्याने कधीच माझी साथ सोडली नाही. त्याने प्रत्येत वळणावर स्वतःला सिद्ध केलं…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

अंकिता लोखंडे – सुशांत सिंह राजपूत

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. कारण दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडत होती. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सुशांत याच्या निधानानंतर अंकिता हिने उद्योजक विकी जैन याच्यासोबत लग्न केलं.

सध्या विकी आणि अंकिता ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहेत. पण अभिनेत्री बिग बॉसमध्ये सतत सुशांत याच्यासोबत असलेल्या आठवणी सांगत असते. ज्यामुळे अंकिता हिला सतत ट्रोल केलं जातं.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.