गर्लफ्रेंडला बळजबरी किस, त्यानंतर रोमान्स, सर्वांसमोर अभिनेत्याने ओलांडल्या सर्व मर्यादा
Bigg Boss 17 : अभिनेत्रीवर बॉयफ्रेंडची बळजबरी... सोशस मीडियावर फोटो व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीच्या आई - वडिलांकडून देखील निराशा व्यक्त... सोशल मीडियावर देखील दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींचे खासगी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून एक सेलिब्रिटी कपल तुफान चर्चेत आहे. सध्या ज्या कपलची चर्चा रंगत आहे, ते कपल ‘बिग बॉस 17’ मधील आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये तीन कपल आहेत. पण समर्थ जुरेल आणि ईशा मालवीय यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस 17’ च्या घरात दोघे अनेकदा रोमांटिक झाले. ज्यामुळे दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं. सध्या सर्वत्र फक्त आण फक्त समर्थ आणि ईशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये समर्थ याने सर्व मर्यादा ओलांडल्या.
नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये देखील समर्थ गर्लफ्रेंड ईशा मालवीय हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसला. कॅमेऱ्यासमोर समर्थ याने सर्व मर्यादा ओलांडल्या… ज्यामुळे समर्थ आणि ईशा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान, एका एपिसोडमध्ये समर्थ ईशा हिला बळजबरी किस करताना दिसला. तेव्हा त्याठिकाणी मन्नरा चोप्रा आणि अंकिता लोखंडे देखील उपस्थित होती.
Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) November 4, 2023
काही दिवसांपूर्वी देखीर समर्थ आणि ईशा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. अशात समर्थ याची वागणूक पाहून बिग बॉस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठारणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईशा हिच्या आई – वडिलांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली. एका मुलाखतीत ईशा हिच्या खास मित्राने मोठा खुलासा केला होता.
ईशा हिचा सह-अभिनेता आणि मित्र लोकेश बट्टा याने अभिनेत्रीच्या आई – वडिलांची प्रतिक्रिया सांगितली होती. ‘बिग बॉसच्या घरातील लेकीच्या वागणुकीमुळे ते प्रचंड दुःखी आहेत. नुकताच ईशा हिच्या आईसोबत बोलणं झालं. बिग बॉसच्या घरातील ईशाची वागणूक तिच्या आई वडिलांना बिलकूल आवडत नाहीये. ईशा हिचे वडील सरकारी नोकरी करतात…’ एवढंच नाही तर ईशा हिचे आई – वडील तिला शोमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत…अशी माहिती देखील समोर येत आहे.
ईशा प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील ईशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.