Bigg Boss 17 नंतर होणार अंकिता लोखंडे – विकी जैन यांचा घटस्फोट? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 17 : 'लग्नानंतर तुला सहन करावं लागत असेल तर...', अंकिता - विकी यांचा होणार घटस्फोट? अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य... इंडस्ट्रीमध्ये होणार आणखी एक घटस्फोट... 'बिग बॉस 17' मधून बाहेर आल्यानंतर अंकिता - विकी यांच्या नात्याचा होणार अंत?

Bigg Boss 17 नंतर होणार अंकिता लोखंडे - विकी जैन यांचा घटस्फोट? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 2:33 PM

मुंबई | 22 डिसेंबर 2023 : ‘बिग बॉस’चे आतापर्यंत अनेक सीझन झाले आहेत. पण ‘बिग बॉस 17’ मध्ये वेगळेपण आहे. ‘बिग बॉस’ मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांची चर्चा रंगलेली असते. बिग बॉसच्या घरात सतत दोघांमध्ये वाद होताना दिसतात. बिग बॉसमध्ये विकी हा पत्नी अंकिता हिला इग्नोर करत असल्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण आता तर ‘बिग बॉस 17’ शोमधून बाहेर आल्यानंतर विकी आणि अंकिता घटस्फोट घेणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. खुद्द अंकिता पतीला विकी याला घटस्फोट घेऊ… असं म्हणाली आहे. अंकिता हिने घटस्फोटाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल…

सांगायचं झालं तर, शोमध्ये विकी जैन आणि आयशा खान एकत्र बोलत बसले होते. तेव्हा विनोदी अंदाजात विकी म्हणतो, ‘लग्नानंतर पुरुष फक्त आणि फक्त सहन करतो.. पण काहीही बोलू शकत नाही… ‘ विकी याला लग्नाबद्दल असं बोलताना पाहून अंकिता संतापते आणि पतीकडून विभक्त होण्याची मागणी करते.

अंकिता म्हणते, ‘विकी मला सांग तू काय सहन करत आहेस. जर तुला इतकं सहन करावं लागत आहे तर, तू माझ्यासोबत का राहात आहेस? ‘ अंकिता हिने रागात विकी याला घटस्फोट दे असं म्हणाली. पण अभिनेत्रीच्या वक्तव्याने चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी आणि अंकिता यांची चर्चा रंगली आहे.

पुढे अंकिता, आयशा हिला म्हणते, ‘मला माहिती आहे की विकी माझ्यावर प्रचंड प्रेम करतो. पण मला जे हवं आहे, ते विकी मला देऊ शकत नाही… मला असं सतत वाटतं विकी मला कंट्रोल करत आहे. माझं कोणत्याही पुरुष स्पर्धकासोबत भांडण होतं, तेव्हा विकी मला माघार घ्यायला लावतो..’, अशात शो संपेपर्यंत विकी आणि अंकिता यांचं नातं कोणत्या टप्प्याला पोहोचतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अंकिता लोखंडे कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक विकी जैन याच्यासोबत लग्न केलं. पण आता अभिनेत्री घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.