मुंबई | 27 जानेवारी 2024 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा रंगली आहे. कारण एका दिवसात ‘बिग बॉस 17’ शोच्या विजेत्याची घोषणार होणार आहे. 28 जानेवारी रोजी संध्याकाळी ‘बिग बॉस 17’ शोचा ग्रॅन्ड फिनाले आहे. शोमध्ये आता पाच स्पर्धक आहेत. या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बिग बॉस 17’ चा विजेता कोण होणार हे चाहते ठरवणार आहेत. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
चाहत्यांमध्ये रंगत असलेल्या चर्चांनुसार, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांची नावे टॉप 3 मध्ये येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तिघांपैकी एक ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरु शकतो… अशी चर्चा रंगत आहे. सध्या सोशल मीडियावर हे. ‘बिग बॉस 17’ चा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
रविवारी प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पूजा भट्ट, करण कुंद्रा आणि अंकिता लोखंडे हिच्यासाठी देखील एक व्यक्ती बिग बॉसमध्ये येणार आहे. येत्या एपिसोडमध्ये प्रत्येक जण त्याच्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसणार आहे.
Promo #BiggBoss17 #KaranKundrra aur #MunawarFaruqui ka heart to conversation, #AnkitaLokhande with Friend and Grand finale performance pic.twitter.com/jtOmhnzVKZ
— The Khabri (@TheKhabriTweets) January 26, 2024
व्हिडीओमध्ये करण कुंद्रा मुनव्वर फारुकी याला सपोस्ट करताना दिसला. मुनव्वर याचं कौतुक करत करण म्हणाला, ‘चुका झाल्या आहेत… माफी देखील मागितली आहे… आपण प्रत्येक जण माणूस आहोत आणि चुका सगळ्यांकडून होतात. मोठ्या लोकांकडून देखील चुका होतात… तुझा प्रवास चांगला आहे…’
पूजा भट्ट हिने मन्नारा हिला विजेती म्हणून घोषित केलं. ‘मी तुझ्या क्राऊनला फिक्स केलं आहे. अनेक नकारात्मक गोष्टी घडल्या. तू स्वतःबद्दल जेवढा विचार करतेस त्याहून अधिक तू स्ट्रॉन्ग आहेस…’ असं पूजा भट्ट, मन्नारा हिला म्हणाली.
पूजा हिने मन्नारा हिला विजेती घोषित केल्यामुळे अनेकांनी पूजा हिच्यावर निशाणा साधला. ‘मुनव्वर जिंकणार, पूजा भट्ट हिच्याकडून काहीही होणार नाही…’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘पूजा याठिकाणी देखील घराणेशाहीला सपोर्ट करताना दिसत आहे…’ तर काहींनी मन्नारा हिचं सपोर्ट केल्यामुळे पूजा हिचं कौतुक केलं.
कधी आहे ‘बिग बॉस 17’ ग्रॅन्ड फिनाले?
‘बिग बॉस 17’ ग्रॅन्ड फिनाले रविवारी संध्याकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. रात्री 12 वाजे पर्यंत कार्यक्रम रंगणार आहे. रात्री 12 नंतर सलमान खान ‘बिग बॉस 17’ विजेत्याची घोषणा केली.