‘बिग बॉस 17’च्या घरात हाय होल्टेज ड्रामा, अरुणने थेट जोडले हात

बिग बॉस 17 च्या घरात मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर या वादामुळे एका स्पर्धेकाला थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील अत्यंत मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

'बिग बॉस 17'च्या घरात हाय होल्टेज ड्रामा, अरुणने थेट जोडले हात
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 12:40 PM

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 मधून तहलका याला बाहेर काढण्यात आले. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य हे ढसाढसा रडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर तर अभिषेक कुमार हा देखील रडताना दिसतोय. आता जवळपास हे स्पष्ट आहे की, तहलका हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडतोय. एक वाद तहलका याच्या चांगलाच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 च्या घरात मोठा नाटक बघायला मिळतंय. याचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

बिग बॉस 17 मध्ये अभिषेक कुमार आणि तहलका यांच्यामध्ये वाद झाला. अभिषेक कुमार याने तहलका याच्यासोबत भांडण्यास सुरूवात केली. त्यानंतर थेट रागामध्ये तहलका याने अभिषेक कुमार याचे शर्ट पकडले. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी तहलका याच्याविरोधात मोर्चा वळवला. तहलका याच्यावर कारवाई करण्याची मागणी सतत करण्यात आली.

शेवटी आता तहलका याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. मात्र, तहलका हा घराच्या बाहेर पडत असतानाच सर्वचजण रडताना दिसत आहेत. तहलका याचा मित्र अरूण हा तर बिग बॉस 17 च्या निर्मात्यांची हात जोडून माफी मागताना दिसला. इतकेच नाही तर अभिषेक कुमार हा देखील रडताना दिसला.

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी अभिषेक कुमार याच्या रडण्याला फेक म्हटले आहे. एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हा अभिषेक फार जास्त नाटकी आहे. असा दाखवत आहे की, त्याला फार जास्त दु:ख झाले.

तहलका हा बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर पडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. तहलका याची या भांडणामध्ये चुक नसल्याचे त्याचे चाहते सांगताना दिसत आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी तहलका याला परत एकदा बिग बॉस 17 च्या घरात घ्यावे असे म्हटले आहे. आता तहलका हा परत बिग बॉस 17 मध्ये दाखल होतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.