‘तिकिट टू फिनाले’मधून अंकिता लोखंडे बाहेर? ‘बिग बॉस 17’मध्ये मोठा ट्विस्ट

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या आधी स्पर्धकांना टॉर्चर टास्क देण्यात आला. या टास्कमुळे फिनालेची सर्व गणितं बदलली आहेत. अंकिता लोखंडेला तिकिट टू फिनाले मिळू शकलं नाही. इतकंच नव्हे तर पुढच्या एलिमिनेशन राऊंडसाठी ती नॉमिनेटसुद्धा झाली आहे.

'तिकिट टू फिनाले'मधून अंकिता लोखंडे बाहेर? 'बिग बॉस 17'मध्ये मोठा ट्विस्ट
Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 8:22 AM

मुंबई : 18 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’ हा सर्वांत लोकप्रिय रिॲलिटी शो सध्या अंतिम टप्प्यात आहे. येत्या 28 जानेवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ग्रँड फिनालेच्या आधी शोमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी बिग बॉसने स्पर्धकांना अनोखा टास्क दिला. शो अंतिम टप्प्यात आला असताना स्पर्धकांमध्ये टॉर्चर टास्क खेळला गेला. या टास्कसाठी घरातील स्पर्धक दोन भागांमध्ये विभागले गेले. ‘अ’ टीममध्ये मुनव्वर फारुखी, अरुण माशेट्टी, अभिषेक कुमार आणि मन्नारा चोप्रा यांचा समावेश होता. तर ‘ब’ टीममध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, आयेशा खान आणि इशा मालवीय होते.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये टीम ‘अ’ने बाजी मारली आणि त्यांनी यशस्वीरित्या टास्क पूर्ण केला. त्यामुळे या टीमला खास अधिकार बिग बॉसकडून देण्यात आले. टीम ‘ब’मधील स्पर्धकांचं भवितव्य काय असेल, याचा निर्णय टीम ‘अ’ला घेण्यास सांगितलं गेलं. यानंतरच शोमध्ये मोठा ट्विस्ट आला. बिग बॉसने विशेष अधिकार देताच टीम ‘अ’ने टीम ‘ब’मधील सर्व स्पर्धकांना नॉमिनेट केलं. यामध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आयेशा खान यांचा समावेश होता. पुढच्या एलिमिनेशन राऊंडसाठी या चौघांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.

बिग बॉसच्या या निर्णयामुळे टीम ‘अ’चा बराच फायदा झाला. कारण या टीममधील सर्व स्पर्धक थेट बिग बॉसचे फायनिस्ट ठरले. त्यामुळे अरुण माशेट्टी, मुनव्वर फारुखी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. आता पुढील एलिमिनेशन राऊंडमध्ये नेमकं काय होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात आतापर्यंत मुनव्वर फारुखी, अभिषेक कुमार आणि अंकिता लोखंडे या तिघांना तगडे स्पर्धक मानलं जात होतं. अंतिम टप्प्यात या तिघांमध्ये चुरस रंगणार असल्याची शक्यता होती. मात्र अंकिताने ‘तिकिट टू फिनाले’ गमावला आहे.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकीमध्ये सतत भांडणं होत आहेत. तर बिग बॉसच्या बाहेर अनेक सेलिब्रिटी अंकिताच्या समर्थनार्थ पोस्ट लिहित आहेत. यामध्ये रितेश देशमुख, रश्मी देसाई, रिधी डोग्रा, अली गोणी, सनी लियोनी यांचा समावेश आहे. इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांकडून अंकिताला पाठिंबा मिळतोय. त्यामुळे फिनालेपर्यंत सर्वांत आधी तीच पोहोचेल असा अंदाज होता. मात्र टॉर्चर टास्कमुळे फिनालेची सर्व गणितं आता बदलली आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.