या स्पर्धकाच्या आईने संपवलं होतं आयुष्य; ‘बिग बॉस 17’च्या घरात धक्कादायक खुलासा

बिग बॉसच्या घरातील स्पर्धक अनेकदा एकमेकांसमोर आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करत असतात. याआधी अंकिता लोखंडे अनेकदा सुशांत सिंह राजपूतविषयी व्यक्त झाली. आता नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने त्याच्या आईविषयी मोठा खुलासा केला आहे.

या स्पर्धकाच्या आईने संपवलं होतं आयुष्य; 'बिग बॉस 17'च्या घरात धक्कादायक खुलासा
BIGG BOSS 17Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 12:50 PM

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | एकाच घरात जेव्हा अनेक स्पर्धक बऱ्याच दिवसांसाठी बंद केले जातात, तेव्हा त्यांच्यात भावनिक जवळीक निर्माण होणं स्वाभाविक असतं. ‘बिग बॉस’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणाऱ्यांना इतरांसोबत घरात जुळवून घ्यावं लागतं. अनेकदा त्यांच्यात भांडणं होतात, तर कधी ते एकमेकांसमोर आपलं मन मोकळं करतात. असंच काहीसं ‘बिग बॉस 17’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये पहायला मिळालं. या शोमधील स्पर्धक आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत मोकळेपणे शेअर करत आहेत. सध्याच्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला आणि विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारुकी. मुनव्वरने अनेकदा बिग बॉसच्या घरात त्याच्या खासगी आयुष्याविषयी खुलासे केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये त्याने त्याच्या आईविषयी धक्कादायक खुलासा केला.

मुनव्वरच्या आईने संपवलं आयुष्य

मुनव्वरने त्याच्या आईविषयी जे सांगितलं, ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. गार्डन एरियामध्ये रिंकू, ऐश्वर्या, नील आणि मुनव्वर एकत्र बसलेले होते. त्यावेळी मुनव्वर त्यांना सांगतो, “आम्ही लहानपणी एक चपाती आणि एक डाळ खाऊन राहायचो. त्यावेळी ते आवडायचंसुद्धा.” हे ऐकल्यानंतर रिंकू मुनव्वरला विचारतो की, “तुझ्या आईचं निधन कधी झालं?” याचं उत्तर देताना मुनव्वर सांगतो, “मी 13 वर्षांचा असताना माझ्या आईने स्वत:चं आयुष्य संपवलं. तिने ॲसिड पिऊन या जगाचा निरोप घेतला होता.”

हे सुद्धा वाचा

मुनव्वरच्या आईबद्दल ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसतो. यावेळी ऐश्वर्या शर्मा मुनव्वरला आईच्या आत्महत्येचं कारण विचारते. तेव्हा तो सांगतो, “त्यावेळी खूप समस्या होत्या. माझ्या वडिलांसोबत त्यांचं नातं चांगलं नव्हतं. खूप सारं कर्ज डोक्यावर होतं आणि इतरही बऱ्याच गोष्टी होत्या.” आईबद्दल बोलताना मुनव्वर भावूक होतो आणि पुढे म्हणतो, “याविषयी नंतर कधीतरी बोलुयात.” घरातील विविध समस्यांमुळे अभ्यास पूर्ण करू शकलो नसल्याचंही मुनव्वरने याआधी बऱ्याचदा सांगितलं होतं. घराची परिस्थिती सुधारण्यासाठी त्याने कमी वयात काम करण्यास सुरुवात केली.

मुनव्वरने बिग बॉसच्या घरात त्याच्या गर्लफ्रेंडविषयीही खुलासा केला होता. नाजिलाला डेट करत असल्याचं त्याने बिग बॉसच्या घरात म्हटलं होतं. याआधी कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये असताना त्याचं नाव अंजली अरोरासोबत जोडलं गेलं होतं. मुनव्वर घटस्फोटीत असून कमी वयातच त्याचा निकाह झाला होता. त्याला पाच वर्षांचा एक मुलगासुद्धा आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.