Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘या’ स्पर्धकाचं नशीब चमकलं, थेट रोहित शेट्टीसोबत…

Bigg Boss 17 | बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्येही रोहित शेट्टी सहभागी झाला होता. फिनालेपूर्वी त्याने स्पर्धकांकडून एक स्टंट करून घेतला होता. तर गेल्या शो मधील उपविजेता शिव ठाकरेला शो देखील ऑफर केला होता. तर बिग बॉस सीझन 16 ची दुसरी स्पर्धक अर्चना गौतम ही देखील रोहित शेट्टीसोबत दिसली होती.

Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच 'या' स्पर्धकाचं नशीब चमकलं, थेट रोहित शेट्टीसोबत...
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 3:16 PM

मुंबई | 25 जानेवारी 2024 : Bigg Boss 17 चा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या आठवड्याच्या अखेरीस, 28 जानेवारी रोजी या शोचा अंतिम दिवस असून ग्रँड फिनाले पार पडेल. सलमान खान हा ग्रँड फिनाले होस्ट करणार असून या सीझनचा विजेताही जाहीर करेल. मात्र त्यापूर्वी देखील या शोमधील स्पर्धकांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी येणार आहे. एवढंच नव्हे तर तो स्पर्धकांना त्याच्या खतरों के खिलाड़ीच्या नव्या (14) व्या सीझनमध्ये सहभागी होण्याची देखील संधी देईल.

बिग बॉसच्या मागच्या सीझनमध्येही रोहित शेट्टी सहभागी झाला होता. फिनालेपूर्वी त्याने स्पर्धकांकडून एक स्टंट करून घेतला होता. तर गेल्या शो मधील उपविजेता शिव ठाकरेला शो देखील ऑफर केला होता. तर बिग बॉस सीझन 16 ची दुसरी स्पर्धक अर्चना गौतम ही देखील रोहित शेट्टीसोबत दिसली होती. तर त्या आधी बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्येही तो आला होता, तेव्हाही घरातील स्पर्धकांनी काही स्टंट केले होते.

घरात दिसणार रोहित शेट्टीचा जलवा

सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील बिग बॉस सीझन 17 मध्येही रोहित शेट्टी घरात एंट्री करेल. या शोबद्दल ताजी माहिती देणाऱ्या एका पेजवर याबद्दल माहिती देण्यात आली. रिपोर्ट्सनुसार,रोहितने घरात एंट्री केली आणि शोमधील पाच स्पर्धकांना एक टास्क करायला लावला. आणि तो टास्क जो जिंकेल त्या स्पर्धकाला रोहित शेट्टीसोबत त्याच्या खतरों के खिलाड़ी सीझन 14 मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कोण जिंकणार ?

आता बिग बॉस 17 च्या घरात मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे आणि अरुण मशेट्टी हे पाच स्पर्धकच उरले आहेत. रोहित शेट्टीच्या टास्कमध्ये त्या सर्वांनीच कठोर मेहनत करत परफॉर्मन्स दिला. आता कोण विजेता ठरणार हे शोच्या ताज्या एपिसोडमध्ये समोर येईल.

मुनव्वर फारुकीशी जुनं नातं

मुनावर फारुकीला खतरों के खिलाडी सीझन 13ची ऑफर देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, पासपोर्टच्या समस्येमुळे तो देशाबाहेर प्रवास करू शकला नाही आणि यामुळे तो खतरों के खिलाडी 13 मध्ये सहभागी होऊ शकला नाही.

लवकरच पार पडणार ग्रँड फिनाले

बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. या शोचा फिनाले आता 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या ग्रँड फिनालेमध्ये मोठी धमाल होणार हे निश्चितच आहे. सलमान खान हा होस्ट करणार असून मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे आणि अरुण मशेट्टी यांच्यापैकी कोणाला बिग बॉसची ट्रॉफी मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.