सलमान खान याच्या निशाण्यावर अभिषेक कुमार, ‘त्या’ विधानावरून अभिनेता वादात
बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे घरता मोठे भांडणे होताना दिसत आहेत. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.
मुंबई : बिग बाॅस 17 चा विकेंडचा वार हा धमाकेदार होणार असल्याचे दिसतंय. या विकेंडच्या वारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसत आहे. इतकेच नाही तर सलमान खान याचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतोय. सलमान खान याच्या निशाण्यावर यावेळी अभिषेक कुमार आणि मनारा चोप्रा हे दिसले आहेत. विशेष म्हणजे मनारा हिच्यावर भडकलेला सलमान खान दिसला.
सलमान खान याने ईशा आणि अभिषेक यांच्यामध्ये झालेल्या वादावरून अभिषेक याचा क्लास लावला. सलमान खान म्हणाला की, मी असताना असे केले असते तर मी निचडून टाकले असते. ईशा हिला सलमान खान म्हणाला की, यानंतर ईशा अभिषेक हा रडला, ओरडला आणि काहीही असेल तरीही तू त्याच्याजवळ अजिबात जायचे नाही.
पुढे सलमान खान म्हणाला की, या घरात सर्वात फेक व्यक्ती अभिषेक कुमार हाच आहे. अभिषेक कुमार याने भांडणामध्ये ईशाबद्दल अनेक मोठे खुलासे केले. जे सलमान खान याला अजिबातच आवडले नाहीत. यानंतर सलमान खान याने आपला मोर्चा हा मनारा चोप्रा हिच्याकडे वळवला. मनारा हिला खडेबोल सुनावताना सलमान खान दिसला.
सलमान खान म्हणाला, मनारा चोप्रा मी खूप जास्त निराश आहे तुझ्यावर. स्पॉइल्ड चाइल्डचे वय तुझे निघून गेले आहे. मुनव्वर याला मनारा हिच्याबद्दल बोलताना सलमान खान हा म्हणाला की, मुनव्वर तू जग बघितले आहेस, असे होते का. ही तुझी जबाबदारी नाहीये. हिच्या डोक्यात काहीच येणार नाहीये. ही स्वत: गेम खेळत असल्याचे देखील सलमान खान याने म्हटले आहे.
गेल्या काही विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा मनारा चोप्रा हिला समजवताना दिसला. मात्र, आता सलमान खान याने थेट मनारा चोप्रा हिचा क्लास लावला आहे. बिग बाॅसच्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली. मात्र, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये बिग बाॅसच्या घरात मोठी भांडणे होताना दिसत दिसत आहेत.