Bigg Boss 17 : ईशा – समर्थ यांचा सर्वांसमोर रोमान्स, त्याचे वडील म्हणाले, ‘मला लाज वाटत नाही कराण…’
Bigg Boss 17 : ईशा - समर्थ यांचा सर्वांसमोर रोमान्स, समर्थ याच्या वडिलांकडून मोठा खुलासा... म्हणाले, 'सर्व काही नॅचरल आहे... लाज वाटण्यासारखं...', सध्या सर्वत्र समर्थ याच्या वडिलांच्या प्रतिक्रियेची चर्चा...
मुंबई | 12 जानेवारी 2024 : ‘बिग बॉस 17’ मध्ये सध्या अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’मध्ये सुरु असलेल्या फॅमिली वीकची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. फॅमिली विक असल्यामुळे सर्व स्पर्धकांचे कुटुंबिय बिग बॉसमध्ये आले होते. समर्थ जुरेल याचे वडील देखील बिग बॉसमध्ये आले होते. दरम्यान शो मधून बाहेर आल्यानंतर समर्थ याच्या वडिलांनी सर्वांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, त्यांनी ईशा आणि समर्थ यांच्या नात्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सर्वांसमोर सुरु असलेल्या समर्थ आणि ईशा यांच्या रोमान्सबद्दल देखील त्यांनी मोठी वक्तव्य केलं आहे. समर्थ याच्या वडिलांची प्रतिक्रिया जाणून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल…
टीव्हीवर सर्वांसमोर सुरु असलेल्या समर्थ – ईशा यांच्या रोमान्सवर समर्थ याचे वडील म्हणाले, ‘मला कसलीही लाज वाटत नाही. कारण सर्वकाही नॅचरल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर काय – काय येत आहे. आपण तर कपलला पाहात आहोत. दोन्ही मुलं एकमेकांवर प्रेम करतात. दोघांमध्ये जे काही आहे, ते फेक नाही…’
टीव्हीवर समर्थ आणि ईशा यांचा रोमान्स पाहून समर्थ याच्या वडिलांना कोणतीही हरकत नाही. ईशा हिच्या कुटुंबियांबद्दल देखील समर्थ याच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला नाही वाटत त्यांनी देखील काही हरकत असेल. कारण मी त्यांना भेटलो आहे… तेव्हा मला असं काहीही वाटलं नाही…’ असं समर्थ याचे वडिल म्हणाले.
पुढे समर्थ याचे वडील म्हणाले, ‘दोघांमध्ये असलेलं नातं मला मान्य आहे. मी दोघांसोबत आहे. पुढे जाऊन दोघे त्यांच्या नात्याबद्दल कोणता निर्णय घेत असतील तर, मी त्यांच्या सोबत आहे. पण मला असं वाटतं आधी त्यांनी करियरकडे लक्ष दिलं पाहिजे.. त्यानंतर लग्नाचा विचार करायला हवा…’
अभिषेक शर्मा आणि ईशा यांचं नातं…
अभिषेक शर्मा आणि ईशा यांच्या नात्याबद्दल देखील समर्थ याच्या वडिलांना विचारण्यात आलं. यावर समर्थ याचे वडील म्हणाले, ‘समर्थ याने मला कधीही ईशा हिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक याच्याबद्दल सांगितलं नाही. पास्ट प्रत्येकाचा असतो… काही हरकत नाही…’ असं देखील समर्थ याचे वडील म्हणाले.