Bigg Boss 17 : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने उचललं मोठं पाऊल; अंकिताच्या सासूबाईंचा होईल संताप?

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे हिला अडचणीत पाहून सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीने उचललं मोठं पाऊल... 'तो' व्हिडीओ पासून अंकिताच्या सासूबाई पुन्हा भडकतील? सध्या सर्वत्र अंकिता हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Bigg Boss 17 : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने उचललं मोठं पाऊल; अंकिताच्या सासूबाईंचा होईल संताप?
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 8:36 AM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : अभिनेत्री अंकिता लोखंड गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर बिग बॉस शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. बिग बॉसमध्ये अंकिता सतत दिवंगत अभिनेता आणि एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलत असते. ज्यामुळे अंकिता हिला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं. अंकिता हिने सतत सुशांत याच्याबद्दल बोलू नये… असा सल्ला अंकिता हिच्या आईने लेकीला फॅमिली विकमध्ये दिला होता. आता सुशांत याच्या बहिणीने देखील अंकिता हिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे अंकिता हिच्या सासूबाई आणि विकी जैन याच्या आई रंजना जैन यांना राग येऊ शकतो… असं देखील चर्चा होत आहे…

सुशांत याची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर अंकिता आणि आईचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत सुशांत याच्या बहिणीने कॅप्शनमध्ये ‘आम्ही तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो अंकिता… तू सगळ्यात आहेस आणि साफ मनाची आहेस…’ सध्या सर्वत्र सुशांत याच्या बहिणीच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

श्वेता हिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता हिची आई म्हणते, ‘अंकिता आज देखील श्वेता हिच्यासोबत बोलते. राणी देखील तिला कॉल करते. सुशांत हिच्या वडिलांसोबत देखील अंकिता बोलते… अजून काय हवं आहे… मी 7 सात वर्ष सुशांत याच्यासोबत होती. सुशांतवर अंकिता प्रचंड प्रेम करायची.. अंकिता हिने कधीच स्वतःहून सुशांत याच्याबद्दल काही सांगितलं नाही. मुनव्वर याने विचारल्यानंतर अंकिताने सांगितलं सुशांत कसा होता…’

पुढे अंकिता हिच्या आई म्हणाल्या, ‘एकदा अभिषेक याने विचारलं होतं सुशांत कसा होता… तेव्हा अंकिता म्हणाली होती, ‘अभिषेक तुला पाहिल्यानंतर मला सुशांत याची आठवण येते… मी शो रोज पाहाते त्यामुळे मला सर्वकाही माहिती आहे…’ सध्या सर्वत्र अंकिता हिच्या आईचा देखील व्हिडीओ व्हायरल होत आहे…

सांगायचं झालं तर, बिग बॉसमध्ये अंकिता हिने अनेकदा सुशांत याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं… प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी फक्त सुशांत याच्या नावाचा वापर करत आहे… अशी सर्वत्र चर्चा रंगली होती…

सुशांत आणि अंकिता यांनी एकमेकांना 7 वर्ष डेट केलं. सुशांत याच्या निधनानंतर अंकिता हिने विकी जैन याच्यासोबत लग्न केलं.. पण आता विकी आणि अंकिता यांच्यामध्ये वाद होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र विकी आणि अंकिता यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.