Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेचा लिपलॉक; कंगना रनौतची प्रतिक्रिया ऐकून हसू अनावर!

'बिग बॉस 17'चा पहिला वीकेंड का वार एपिसोड अत्यंत धमाकेदार होता. या एपिसोडमध्ये बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगना रनौतने हजेरी लावली होती. कंगनाने घरातील स्पर्धकांना टास्क दिला आणि या टास्कदरम्यान अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत लिपलॉक केला.

Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेचा लिपलॉक; कंगना रनौतची प्रतिक्रिया ऐकून हसू अनावर!
Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात अंकिता लोखंडेचा लिपलॉकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 9:46 AM

मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या शोमध्ये ‘वीकेंड का वार’चा दुसरा एपिसोड रविवारी प्रसारित झाला. या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी खूप धमाल केली. तर प्रेक्षकांनाही मनोरंजनासाठी बऱ्याच मजेशीर गोष्टी पहायला मिळाल्या. रोमान्सपासून भांडणापर्यंत यामध्ये सर्वकाही घडलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत या एपिसोडमध्ये तिच्या आगामी ‘तेजस’ या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पोहोचली होती. वीकेंड का वार एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलं, ते पाहुयात..

अंकिता लोखंडेचा लिपलॉक

बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर कंगनाने स्पर्धकांना एक मजेशीर टास्क दिला होता. घरातील दोन कपल्समधील केमिस्ट्री तपासण्यासाठी तिने हा खास टास्क दिला होता. यामध्ये नील भट्ट-ऐश्वर्या शर्मा आणि अंकिता लोखंडे-विकी जैन यांचा समावेश होता. या दोन्ही जोडप्यांना कंगनाने डान्स करण्याचा टास्क दिला होता. त्यावर अंकिता आणि विकीने ‘हंगामा हो गया’ या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला. या डान्सच्या अखेरीस दोघं एकमेकांना लिप-लॉक करतानाही दिसले. हे पाहून कंगना त्यांना म्हणाली, “आता यापेक्षा अधिक काही करू नका.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सलमानने घेतली खानजादीची शाळा

‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने खानजादी म्हणजेच फिरोजा खानला चांगलंच फटकारलं. सिंगर आणि रॅपर खानजादी सतत मुनव्वर बोलताना मधे मधे बोलत होती. यादरम्यान सलमान तिला चार वेळा थांबवतो. मात्र तरीही ती त्याचं ऐकत नाही. तिचं हे वागणं ऐकून सलमान तिच्यावर चांगलाच भडकतो.

तीन विभागात स्पर्धकांची विभागणी

‘बिग बॉस 17’मधील घर यंदा दिल, दिमाग आणि दम या तीन भागांमध्ये विभागलं गेलंय, हे तुम्हाला माहीतच असेल. यानुसार आता घरातील सदस्यांचीही तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दिल झोनमध्ये ईशा मालवीय, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांचा समावेश आहे. तर मुनव्वर फारुखी, मन्नारा चोप्रा, फिरोजा खान ऊर्फ खानजादी, रिंकू धवन, जिग्ना वोरा आणि नाविद सोल हे दिमाग झोनमध्ये आहेत. दम या झोनमध्ये अनुराग डोभाल, अरुण श्रीकांत, तहलका भाई, सना रईस खान आणि सोनिया बंसल यांचा समावेश आहे.

पहिल्या आठवड्यात कोण झालं बेघर?

पहिल्या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. यामध्ये अभिषेक, नाविद आणि मन्नारा चोप्रा यांचा समावेश होता. यापैकी मन्नारा आणि नाविद हे सुरक्षित असल्याचं सलमानने जाहीर केलं. तर अभिषेकने आधीच त्याचं सामान पॅक केलं होतं. सलमानने त्याला घराबाहेर जाण्यास सांगितलं तेव्हा तो बॅग घेऊन तयार झाला होता. मात्र नंतर ‘भाईजान’ने स्पष्ट केलं की पहिलाच आठवडा असल्याने कोणताही स्पर्धक घराबाहेर जाणार नाही.

कंगनासोबत मन्नारा चोप्राचा डान्स

वीकेंड का वार एपिसोडमध्ये मन्नारा चोप्राने कंगना रनौतसोबत डान्स केला. ‘लंदन ठुमकदा’ या कंगनाच्याच गाण्यावर दोघींनी पंजाबी स्टाइलमध्ये ठेका धरला होता. यावेळी घरातील इतर स्पर्धकांनी धमाल केली. डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.