मुनव्वर फारूकीची प्रकृती खालावली, रुग्णालयातील फोटो समोर, चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui : मुनव्वर फारूकीची प्रकृती खालावली, रुग्णालयातील फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी व्यक्त केली चिंता, मुनव्वर फारूकी याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... त्याला नक्की झालंय तरी काय?
स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी याची प्रकृती खालावली आहे. त्याला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं आहे. 24 मे रोजी मुनव्वर याला रुग्णालयात दाल करण्यात आलं आहे. मुनव्वर याची प्रकृती खालावल्याची माहिती त्याच्या एका मित्राने चाहत्यांना दिली. मुनव्वर याचा खास मित्र नितिन मेंघानी याने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. नितीन मेंघानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘बिग बॉस 17’ च्या विजेत्याचा हॉस्पिटलच्या बेडवर विश्रांती करतानाचा एक फोटो शेअर केला, मुनावर याच्या हातावर IV ड्रिप दिसत आहे.
मुनव्वर फारूकी याचा रुग्णालयातील फोटो पोस्ट करत मित्र कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘माझ्या भावाला लवकर बरं वाटावं म्हणून सर्वांनी प्रार्थना करा…’ सध्या मुनव्वर याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
सांगायचं झालं तर, याआधी देखील मुनव्वर याची प्रकृती खालावली होती. गेल्या महिन्यात देखील मुनव्वर याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुनव्वर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रुग्णालयात असला तरी मुनव्वर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.
शुक्रवारी मुनव्वर याने पुणे अपघाताप्रकरणी संताप व्यक्त केला होता. एक्सवर मुनव्वरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मुनव्वर म्हणाला, ‘तो पोर्श खरेदी करू शकतो तर, बाकी गोष्टी देखील विकत घेऊ शकतो…मी 17 वर्षांचा होतो तेव्हा माझ्याकडे फक्त नोकिया 1100 फोन होता. ज्याला 2 रबर लावलेले होते…’, मुनव्वर याच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याची चर्चा रंगली आहे. पूर्वी फक्त सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या मुनव्वर याच्या लोकप्रियतेत ‘बिग बॉस 17’ नंतर मोठी वाढ झाली. आता मुनव्वर अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण करणार आहे. ‘फस्ट कॉपी’ या वेब सीरिजमध्ये मुनव्वर भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोशल मीडियावर देखील मुनव्वर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर देखील मुनव्वर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मुनव्वर कायम स्वतःचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.