गरीबी पाहिलेला मुनव्वर फारुकी कमावतो कोट्यवधींची माया, एका शोसाठी घेतो लाखो रुपये

munawar faruqui : गरीबीवर मात करत मुनव्वर फारुकी यशाच्या शिखरावर... कॉमेडी, शायरी, शो, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुनव्वर कमावतो कोट्यवधींची माया... , वडिलांच्या प्रकृती खालावल्यानंतर घराची जबाबदारी होती मुनव्वर याच्या खांद्यावर.. आता कोट्यवधी रुपयांचा मालक आहे मुनव्वर

गरीबी पाहिलेला मुनव्वर फारुकी कमावतो कोट्यवधींची माया, एका शोसाठी घेतो लाखो रुपये
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 1:06 PM

मुंबई | 31 जानेवारी 2024 : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या ‘बिग बॉस 17’ मुळे तुफान चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान याने मुनव्वर याचं नाव ‘बिग बॉस 17’ शोचा विजेता म्हणून घोषित केलं आणि मुनव्वर याचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्यानंतर मुनव्वर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुनव्वर याने अनेक ठिकाणी छोटी-छोटी कामं केली. पण आज मुनव्वर कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. मुनव्वर त्याच्या कौशल्यामुळे कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

गरीबी अनेक प्रसंगांचा सामना केलेला मुनव्वर आज अनेक माध्यमांमधून कोट्यवधींची कमाई करत आहे. कॉमेडी, शायरी, शो, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मुनव्वर गडगंज पैसा कमावतो. मुनव्वर स्टँडअप कॉमेडियन, लेखक, शायर, युट्यूबर आणि अभिनेता आहे.

रिपोर्टनुसार, मुनव्वर याच्याकडे जवळपास 8 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुनव्वर प्रत्येक स्टँडअप कॉमेडी शोसाठी 1.5 ते 2.5 लाख रुपये मानधन घेतो. इन्स्टाग्रामवर मुनव्वर याने 12 मिलियन फॉलोअर्स आहेत. म्हणून प्रत्येक स्पॉन्सर्ड पोस्टसाठी मुनव्वर जवळपास 15 लाख रुपये मानधन घेतो.

हे सुद्धा वाचा

याशिवाय मुनव्वर, ब्रॉन्ड कोलॅबोरेशन, म्यूझिक व्हिडीओ, युट्यूब इत्यादी मार्गांनी बक्कळ पैसा कमावतो. बिग बॉसमधील अभिनेत्याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ शोच्या एका एपिसोडसाठी मुनव्वर याने 7 ते 8 लाख रुपये मानधन घेतलं आहे. ‘बिग बॉस 17’ घरात 105 दिवस राहण्यासाठी मुनव्वर याने 1.2 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची देखील चर्चा रंगत आहे.

एवढंच नाही तर, मुनव्वर याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर, मुनव्वर याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली असून मुनव्वर याला 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळालं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, मुनव्वर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे मुनव्वर याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.