Munawwar Farooqui : ‘तेव्हा कळली पैशांची खरी किंमत…’, मुनव्वर याच्या आयुष्यातील ‘तो’ धक्कादायक प्रसंग

Munawwar Farooqui : आयुष्य खरंच खूप कठीण आहे... हालाखीची परिस्थिती, वडिलांचं निधन, खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी, 'त्या' प्रसंगानंतर मुनव्वर कळली पैशांची खरी किंमत... असंख्य संकटांचा सामना करत 'बिग बॉस 17' पर्यंत पोहोचला मुनव्वर...

Munawwar Farooqui : 'तेव्हा कळली पैशांची खरी किंमत...', मुनव्वर याच्या आयुष्यातील 'तो' धक्कादायक प्रसंग
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 9:42 AM

मुंबई | 29 जानेवारी 2024 : अभिनेता आणि ‘बिग बॉस 17’ शोचा होस्ट सलमान खान याने डोंगरीचा स्टार मुनव्वर फारूकी याच्या नावाची घोषणा विजाता म्हणून केली आणि मुनव्वर याचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. आज मुनव्वर त्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर लाखो रुपये कमावतो. पण एक दिवस असा होता जेव्हा मुनव्वर याला कुटुंबाची भूक भागवण्यासाठी अनेक ठिकाणी काम करावं लागलं. दरम्यान, असा एक प्रसंग आला जेव्हा मुनव्वर याला पैशांची खरी किंमत कळली आणि मुनव्वर याचा खरा प्रवास सुरु झाला… खुद्द मुनव्वर याने त्याच्या आयुष्यातील वाईट आणि कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

मुनव्वर स्वतःच्या आयुष्यात आलेल्या कठीण दिवसांना संघर्ष नाही तर, जीवनातील एक भाग म्हणून पाहतो. आयुष्यातील जुने दिवस आठवत मुनव्वर म्हणतो, ‘माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं, जेव्हा माझ्या वडिलांची प्रकृती खालावली. मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली…’

पुढे मुनव्वर म्हणाला, ‘माझ्या कुटुंबासाठी तो काळ कठीण होता. फक्त काम करायचं आहे आणि कुटुंबाची भूक भागवायची आहे… ही एकच गोष्ट आयुष्यात उरली होती. त्यासाठी पर्याप्त पैशांची गरज होती. जेव्हा कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव झाली, मी अनेक ठिकाणी काम केलं…. तेव्हा मला पैशांची खरी किंमत कळली…’

‘आयुष्यात जे काही झालं त्याकडे मी संघर्ष म्हणून नाही तर जीवनातील एक भाग म्हणून पाहतो… मी जेव्हा पहिल्यांदा माईक हातात घेतला तेव्हा मी भावुक झालो होतो… तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरु शकत नाही. मी जे काही शिकलो आहे, ते अनुभवातून शिकलो आहे…’

‘जीवनात अनेक अडचणी आल्या, पण कधीच मागे वळून पाहिलं नाही. आशा गमावली नाही. शेवट सूर्य चमकतोच…’ असं देखील मुनव्वर म्हणाला होता… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर फारुकी याची चर्चा रंगली आहे. ‘लॉकअप’ त्यानंतर ‘बिग बॉस 17’ चा विजेता ठरल्यानंतर सर्वत्र मुनव्वर याची चर्चा रंगली आहे.

मुनव्वर याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा झाल्यानंतर, ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी मिळाली आहे. एवढंच नाही तर, मुनव्वर याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली असून मुनव्वर याला 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळालं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.