‘बिग बॉस 17’च्या विजेत्याचं नाव लीक; अंकिता किंवा अभिषेक नव्हे तर ‘हा’ स्पर्धक ठरणार विजेता?

'बिग बॉस 17' सध्या अंतिम टप्प्यात असून प्रत्येक स्पर्धक विजेतेपद पटकावण्यासाठी जोर लावत आहे. येत्या 28 जानेवारी रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून त्यापूर्वीच सोशल मीडियावर विजेत्याचं नाव लीक झालं आहे. या विजेत्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

'बिग बॉस 17'च्या विजेत्याचं नाव लीक; अंकिता किंवा अभिषेक नव्हे तर 'हा' स्पर्धक ठरणार विजेता?
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 8:28 AM

मुंबई : 10 जानेवारी 2024 | बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादगस्त रिॲलिटी शो आहे. सध्या या शोचा सतरावा सिझन सुरू असून पहिल्या एपिसोडपासूनच त्याच रोज नवीन ड्रामा पहायला मिळतोय. हा सिझन आता अंतिम टप्प्यात पोहोचत असून विजेतेपदावर कोणता स्पर्धक आपलं नाव कोरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, विकी जैन, अभिषेक कुमार हे चौघं तगडे स्पर्धक मानले जात आहेत. अशातच सोशल मीडियावर ‘बिग बॉस 17’च्या विजेत्याचं नाव लीक झालं आहे. हे नाव समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या स्पर्धकाला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

बिग बॉसचा शोचा अंतिम टप्प्यात असल्याने प्रत्येक स्पर्धक जोर लावताना दिसतोय. प्रत्येकाला बिग बॉसची ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्यामुळे काहींनी त्यांच्या खेळातही बदल आणला आहे. स्पर्धकाला मिळालेल्या मतांच्या जोरावर विजेता ठरवला जातो. बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाला सातत्याने चाहत्यांकडून चांगले वोट्स मिळत आहेत. हाच स्पर्धक विजेतेपद पटकावणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर लीक झालेल्या विजेत्याचं नाव अंकिता लोखंडे, विकी जैन किंवा अभिषेक कुमार नसून मुनव्वर फारुकी आहे.

हे सुद्धा वाचा

येत्या 28 जानेवारी रोजी मुनव्वर फारुकी हाच बिग बॉसचा विजेता ठरणार, असं त्यात लिहिलं आहे. या ट्विटनंतर मुनव्वरचे चाहते खूपच खुश झाले आहेत. अनेकांनी त्याच्यावर आतापासूनच शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती किती खरी आहे, हे मात्र प्रेक्षकांना ग्रँड फिनाले रोजीच समजू शकेल. सध्या बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे. आतापर्यंत शोमध्ये विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्या आई आल्या आहेत. तर पुढील एपिसोडमध्ये मुनव्वरची बहीण बिग बॉसच्या घरात त्याला भेटायला येणार आहे.

मुनव्वर फारुकी हा प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि रॅपर आहे. याआधी 2022 मध्ये त्याने कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोचं विजेतेपद पटकावलंय. मुनव्वर हा मूळचा गुजरातमधील जुनागढ इथला आहे. कर्ज आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला लहानपणीच शिक्षण सोडून काम करावं लागलं होतं. मुनव्वर 14 वर्षांचा असताना त्याच्या आईने आत्महत्या केली. त्यानंतर तो मुंबईत राहायला आला. 2020 पासून त्याच्या स्टँडअप कॉमेडी व्हिडीओंना आणि गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळू लागली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.