Bigg Boss 18 साठी स्पर्धक सज्ज, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर
Bigg Boss 18: 'बिग बॉस 18' साठी स्पर्धक झालेत सज्ज, स्पर्धकांची नावे अखेर समोर... यंदाच्या पर्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाचे नाव समोर
Bigg Boss 18 Confirmed List: ‘बिग बॉस ओटीटी’ शो संपल्यानंतर प्रेक्षक ‘बिग बॉस 18’ शोच्या प्रतीक्षेत आहे. शोबद्दलची उत्सुकता देखील चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याला पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत. ‘बिग बॉस 18’ चा पहिला प्रोमो देखील समोर आला आहे. ज्यामुळे यंदाच्या पर्वाची थीम काय असेल… याबद्दल माहिती मिळाली आहे. आता स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर पासून शो टेलीकास्ट होईल. ‘बिग बॉस 18’ च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, यावेळी शोची थीम भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील टीम्सवर आधारित असेल. आता ‘बिग बॉस 18’ च्या कन्फर्म केलेल्या स्पर्धकांची यादी देखील समोर आली आहे ज्यामध्ये शोच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील समोर आलं आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेत्री निया शर्मा हिच्यानंतर अभिनेता धिरज धूपर आणि शोएब इब्राहिम यांच्या नावाची चर्चा आहे. शोएब इब्राहिम याने शोसाठी नकार दिल्याचा माहिची समोर आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘बिग बॉस 18’ शोची चर्चा रंगली आहे.
कोण असेल सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक?
‘बिग बॉस 18’ चा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक अभिनेता धिरज असेल… अशी माहिती समोर येत आहे. शोमध्ये येण्यासाठी अभिनेत्याला त्याला 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. यावेळी ‘बिग बॉस 18’ मध्ये 18 स्पर्धक असणार आहेत. या शोसाठी ईशा कोप्पीकरशीही चर्चा सुरू आहे. याशिवाय शोमध्ये चंद्रिमा सिंघा रॉय आणि अभिनेत्री चाहत पांडेही दिसणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निया शर्मा हिने देखील दोन दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 18’मध्ये सहभागी होण्याचा करार केला आहे. पण असं म्हटले जात आहे की लाफ्टर शेफ्सची मुदत जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. निया शोचा त्याचा एक भाग आहे. त्यामुळे बिग बॉसमध्ये निया दिसेल… याची फार कमी शक्यता आहे.