Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकर ते विवियन डिसेना.. ‘बिग बॉस 18’च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

हिंदी बिग बॉसचा अठरावा सिझन नुकताच सुरू झाल आहे. रविवारी या शोचा ग्रँड प्रीमिअर पार पडला. एकूण 18 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात सहभाग घेतला आहे. या 18 जणांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगणार आहे. हे स्पर्धक कोण आहेत, ते पाहुयात..

Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकर ते विवियन डिसेना.. 'बिग बॉस 18'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 11:38 AM

एकीकडे ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर दुसरीकडे हिंदी बिग बॉसचा 18 वा सिझन नुकताच सुरू झाला. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचं रविवारी ग्रँड प्रीमिअर पार पडलं. यंदाच्या सिझनचं थीम ‘टाइम का तांडव’ असं ठेवण्यात आलं आहे. कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रसारित झालेल्या या ग्रँड प्रीमिअरमध्ये बिग बॉसचं आलिशन घर आणि त्यातील स्पर्धक प्रेक्षकांसमोर आले. हा सिझन जिंकणाऱ्या विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये मिळणार आहेत. यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, ते पाहुयात..

चाहत पांडे- चाहत पांडे ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने ‘हमारी बहू सिल्क’, ‘दुर्गा माता की छाया’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

शहजादा धामी- ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत काम करून अभिनेता शहजादा धामी घराघरात पोहोचला. शोमध्ये पाऊल ठेवताच त्याने ‘ये रिश्ता..’च्या दिग्दर्शकांवर बरेच आरोप केले.

हे सुद्धा वाचा

अविनाश मिश्रा- अविनाश मिश्रा हा चाहतचा सहकलाकार होता. ‘ये तेरी गलियाँ’ आणि ‘इश्कबाज’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

शिल्पा शिरोडकर- साऊथ सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकरसुद्धा यंदाच्या सिझनमध्ये सहभाग झाली आहे. 90 च्या दशकात शिल्पाने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

तजिंदर सिंग बग्गा- बग्गा हे भाजपच्या युवा शाखा भारजीय जनता युवा मार्चाचे राष्ट्रीय सचिव होते. ते उत्तराखंडच्या भाजप युवा शाखेचे प्रभारी म्हणूनही काम करतात.

श्रुतिका अर्जुन- तमिळ अभिनेत्री श्रुतिका अर्जुन ‘बिग बॉस 18’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली.

नायरा एम. बॅनर्जी नायरा ही तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अभिनेत्री आहे. 2009 मध्ये तिने ‘आ ओक्कडु’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

चुम दरांग ‘बधाई दो’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री चुम दरांग बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली. चुम दरांग ही अरुणाचल प्रदेशची असून तिने आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’मध्येही काम केलंय.

करण वीर मेहरा नुकताच ‘खतरों के खिलाडी’ या शोचं विजेतेपद पटकावणारा अभिनेता करण वीर मेहरा आता बिग बॉसमध्ये सहभागी झालाय. त्याने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलंय.

रजत दलाल वादग्रस्त वेटलिफ्टर रजत दलाल बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. एका दुचाकीस्वाराला आपल्या कारने धडक दिल्यामुळे तो नुकताच चर्चेत आला होता.

मुस्कान बामणे मुस्कानने ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत पाखीची भूमिका साकारली होती. नुकतीच तिने ही मालिका सोडली.

आरफीन खान आणि सारा आरफीन खान आरफीन खान हा अभिनेता हृतिक रोशनचा लाइफ कोच आहे. पत्नी सारासोबत तो बिग बॉसच्या शोमध्ये सहभागी झाला आहे.

हेमा शर्मा ऊर्फ व्हायरल भाभी हेमा शर्मा तिच्या डान्स व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली. तिने ‘दबंग 3’, ‘यमला पगला दिवाना’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.

गुणरत्न सदावर्ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

इशा सिंह इशाने वयाच्या 17 व्या वर्षी ‘इश्क का रंग सफेद’ या मालिकेतून पदार्पण केलं. 2022 मध्ये तिने चित्रपटात पहिलं पाऊल ठेवंल होतं.

विवियन डिसेना ‘मधुबाला’, ‘प्यार की ये एक कहानी’ यांसारख्या मालिकेतून विवियन डिसेना घराघरात पोहोचला. 2013 मध्ये त्याने अभिनेत्री वाहबिज दोराबजीशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या तीन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2021 मध्ये त्याने इजिप्शियन पत्रकार नौरान अलीसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.

एलिस कौशिक ‘पंड्या स्टोर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री एलिस कौशिक बिग बॉसच्या 18 व्या सिझनमध्ये सहभागी झाली आहे.

गधाराज गधाराज या गाढवाचीही स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एण्ट्री झाली आहे. घरातील इतर स्पर्धकांना त्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'.
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'.
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का.
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.