चाहत्यांसाठी मोठी बातमी… सलमान खानच्या लग्नाबाबतचा मोठा खुलासा; भाईजान म्हणाला, मला…
बिग बॉस 18 दणक्यात सुरू होत आहे. हा शो यावेळी अत्यंत वेगळा असणार असल्याचं सांगितलं जात आहे. सलमान खान या शोला होस्ट करणार आहे. या शोमध्ये नम्रता शिरोडकर आणि वकील गुणरत्न सदावर्तेंसारखे स्पर्धक येणार असल्याने या शोकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊनही अनेक कलाकारांनी या शोमध्ये येण्यास नकार दिल्याने हा शो आधीच चर्चेत आला आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याने अजूनही लग्न केलेलं नाही. त्यामुळे त्याच्या लग्नाची अधूनमधून चर्चा होत असते. सलमानही त्याच्या लग्नाबाबत फारसा बोलत नाही. त्यामुळे ही उत्सुकता आणखीनच ताणली जाते. पण आता त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावर त्याने भाष्य केलं आहे. बिग बॉस 18मध्ये त्याने त्यावर भाष्य केलं आहे. या शोचा नवा प्रोमो आला आहे. या शोमध्ये अनिरुद्धाचार्य महाराज स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. शोमध्ये येताच त्यांनी सलमान खानला लग्नाबाबतचा प्रश्न विचारला आणि भाईजानला मौन सोडावं लागलं.
बिग बॉस 18मध्ये अनिरुद्धाचर्या महाराज यांनी एन्ट्री घेतली. त्यांनी शोमध्ये भाग घेत सलमानच्या लग्नाचा विषय छेडला. अनिरुद्धाचार्य यांनी एका स्पर्धकाला आधी एक प्रश्न केला. तुम्ही कोणत्या उद्देशाने या ठिकाणी आला आहात? असा सवाल अनिरुद्धाचार्य यांनी विचारला. त्यावर हा स्पर्धक म्हणाला की, राजकीय लोक अत्याधिक लालची असतात. जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला ओळखावं ही लालच असते. त्यावर अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले, तुमचं लग्न झालंय?
अन् सर्वच हसले
स्पर्धक म्हणाला, नाही. त्यावर अनिरुद्धाचार्य यांनी स्पर्धकाला त्याचं वय विचारलं. त्यावर तो म्हणाला, मी सलमान भाईपेक्षा लहान आहे. त्यावर लगेच सलमान म्हणाला, अरे म्हणजे अजून तू बच्चा आहेस. त्यावर अनिरुद्ध महाराज म्हणाले, दोन मुली पाहाव्या लागतील. एक तुमच्यासाठी (स्पर्धकासाठी) आणि दुसरी तुमच्यासाठी (सलमान खान). महाराजांचं हे उत्तर ऐकून सलमान लगेच म्हणाला, नाही… नाही….त्यावर अनिरुद्ध महाराज म्हणाले, आम्ही जी मुलगी घेऊन येऊ ती पळून जाणार नाही. त्यावर सलमान हसत हसत म्हणाला, मला पळून जाणारीच हवी. सलमानचं हे उत्तर ऐकल्यावर एकटा सलमानच नव्हे तर अनिरुद्ध महाराज यांच्यासह सर्वच पोट धरून हसू लागतात.
पाहुणे कोण कोण येणार?
बिग बॉस 18मध्ये टीव्हीवरील अनेक कलाकार सामील होणार आहेत. हा शो पाहण्यासाठी चाहते अत्यंत उत्सुक आहेत. या शोमध्ये व्हिव्हियन डिसेना, एलिस कौशिक आदी स्टार्स दिसणार आहे. बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शिरोडकरही या शोमध्ये दिसणार आहेत. याशिवाय शहजादा धामीही असेल. निया शर्माने मात्र शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. या शो रविवारी रात्री 9 वाजता सुरू होमार आहे. कलर्स आणि जिओ सिनेमावर हा शो पाहता येणार आहे.