‘बिग बॉस 18’ला होस्ट करणार सलमान खान?, मोठा खुलासा, तब्येत खराब असताना…

बिग बॉस सीजन 18 बद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांच्या नजरा आहेत. बिग बॉस 18 ची एक यादीही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. अनेक मोठे कलाकार हे बिग बॉस 18 मध्ये धमाल करताना दिसणार आहेत.

'बिग बॉस 18'ला होस्ट करणार सलमान खान?, मोठा खुलासा, तब्येत खराब असताना...
Salman Khan
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 1:45 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉसला होस्ट करतोय. विशेष म्हणजे अनेक चाहते हे बिग बॉस फक्त आणि फक्त सलमान खान याच्यासाठीच बघतात. सलमान खान सुरूवातीपासून या शोसोबत जोडला गेलाय. सलमान खान याचे चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. सलमान खान हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

काही दिवसांपूर्वीपासून एक चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. ज्यानंतर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. सलमान खान बिग बॉस सीजन 18 ला होस्ट करणार नसल्याचे सांगितले जात होते. यामुळेच सलमान खानचे चाहते नाराज झाले. यावरच आता मोठा खुलासा करण्यात आलाय.

बिग बॉस सीजन 18 ला सलमान खान हाच होस्ट करणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. खराब तब्येत असतानाही सलमान हाच होस्ट करेल. पुढील काही दिवसांमध्येच सलमान खान शोचा प्रोमो शूट करणार असल्याचेही सांगितले जातंय. बिग बॉसचे 18 वे सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.

या सीजनबद्दलही चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे एक यादी व्हायरल होताना देखील दिसली. यामध्ये सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाचा देखील समावेश होता. हैराण करणारे म्हणजे तिने सलमान खानवर गंभीर आरोपही केले होते.

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिचा पती अर्थात शोएब इब्राहिम हा बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार आहे. काही मोठे कलाकारही या सीजनमध्ये सहभागी होतील. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून जय्यत तयारी सुरू असल्याचेही सांगितले जातंय. या सीजनमध्ये काय वेगळे असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.