Bigg Boss 3 OTT: सनाचा करोडपती बॉयफ्रेंड कोण? ग्रँड सेलिब्रेशन असं झालं
Bigg Boss 3 OTT: 'ती जिंकली...', सना मकबूल हिच्यासाठी करोडपती बॉयफ्रेंडची खास पोस्ट, कोण आहे सना मकबूल हिचा बॉयफ्रेंड?, कायम खासगी आयुष्य गुपित ठेवणारी सना लवकरत बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न?
‘बिग बॉस ओटीटी 3’ सीझन आता संपला आहे. शुक्रवारी होस्ट अनिल कपूर यांनी शोची विजेती म्हणून सना मकबूल हिच्या नावाची घोषणा केली. तर रॅपर नेजी रनर-अप ठरला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रणवीर शौरी याला समाधान मानावं लागलं. विजेती म्हणून सना हिच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. सना जिंकल्यानंतर तिची आई आणि बहिण शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आल्या. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सना हिच्या बॉयफ्रेंडने…
सना हिने बिग बॉस ओटीटी 3 शोटी ट्रॉफी जिंकल्यानंतर, सनाच्या बॉयफ्रेंडने देखील तिचं कौतुक केलं. बॉयफ्रेंडने स्वतःसोबत सना फोटो पोस्ट करत ‘ती जिंकली…’ असं कॅप्शन लिहित, सनावर असलेलं प्रेम व्यक्त केलं. फोटोमध्ये सनाच्या बॉयफ्रेंडच्या हातात ट्रॉफी दिसत आहे.
View this post on Instagram
सना हिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर, त्याचं नाव श्रीकांत बुरेड्डी असं आहे. सांगायचं झालं तर, सना कायम स्वतःचं खासगी आयुष्य गुपित ठेवते. पण ग्रँड फिनालेमुळे सनाच्या बॉयफ्रेंडबद्दल सर्वांना माहिती झालं आहे. शिवाय दोघांचा फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या सना म्हणाली होती, माझ्या आयुष्यात खास व्यक्ती आहे. अखेर ग्रँड फिनालेच्या माध्यमातून सना हिच्या आयुष्यातील खास समोर आला आहे. श्रीकांत बुरेड्डी याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो एक उद्योजक आहे. श्रीकांत बुरेड्डी बडीलोन कंपनीचा मालक आहे. ‘बडीलोन’ ही एक पर्सनल लोन देणारी कंपनी आहे. तर सना कंपनीची ब्रँड एंबेसडर आहे. एवढंच नाही तर, श्रीकांत बुरेड्डी याने अनेक कंपन्यांमध्ये संस्थापक म्हणून काम देखील पाहिलं आहे.
सना मकबूल कधी करणार लग्न?
बिग बॉसने फिनालेपूर्वी घरात एक कॉन्सर्ट आयोजित केला होता, ज्यामध्ये शिबानी कश्यप, निकिता गांधी, मीट ब्रदर्स, संजू राठोड आणि नकाश अझीझ यांनी परफॉर्म केलं. मीट ब्रदर्स यांचा परफॉर्म्स सना हिला प्रचंड आवडला आणि तिने तिच्या लग्नासाठी बुकींग करण्याचे संकेतही दिले, ज्यामुळे प्रेक्षकांना ती लग्न करणार असल्याची उत्सुकता वाढली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सना मकबूल हिची चर्चा रंगली आहे.