Bigg Boss : शो सुरु असताना ‘बिग बॉस’चा स्पर्धक अटक, गंभीर आहे प्रकरण
Bigg Boss : रविवारी 'बिग बॉस' शो सुरु असताना 'हा' स्पर्धक अटक; गुन्हा सिद्ध झाल्यास स्पर्धकाला होऊ शकतो तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास... सध्या सर्वत्र 'बिग बॉस'ची चर्चा... स्पर्धकाने असं केलं तरी काय, ज्यामुळे शोमधून त्याला केलं अटक
मुंबई | 24 ऑक्टोबर 2023 : ‘बिग बॉस’ या शोची लोकप्रियता देशभर पसरली आहे. ‘बिग बॉस’ शोमुळे स्पर्धकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस’बद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बिग बॉस फक्त हिंदीतच नाही तर मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रसारित होतो. सध्या, हिंदी ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सुरु आहे. हिंदी ‘बिग बॉस’सोबतच कन्नड आणि बिग बॉस तेलुगु देखील प्रसारित होत आहेत. पण आता कन्नड ‘बिग बॉस’मधून एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. बिग बॉस कन्नड 10 चा स्पर्धक वर्थुर संतोष याला अटक करण्यात आली आहे. रविवारी शो सुरु असताना वर्थुर याला अटक करण्यात आली आहे.
‘बिग बॉस’ शोमध्ये वाघाच्या पंजाचं पेंडेंट घातल्यामुळे वर्थुर संतोष याला अटक करण्यात आली आहे. वनविभागाकडून मिळालेल्या तक्ररीनंतर वर्थुर संतोष याच्यावर कारवाई करण्यात आली. बेंगळुरू शहराचे उप वनसंरक्षक एन रवींद्र कुमार यांनी वर्थुर संतोष याच्या अटकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्थुर संतोष याची चर्चा रंगली आहे.
Bigg Boss Kannada Season 10 contestant Varthur Santhosh arrested from sets over ‘tiger claw’ locket.#BiggBoss #BiggBossKannada pic.twitter.com/a5CUfQQTWw
— Bigg Boss Khabri (@09Biggboss) October 23, 2023
बेंगळुरू शहराचे उप वनसंरक्षक एन रवींद्र कुमार म्हणाले, ‘संतोष याने वाघाच्या पंजाचं पेंडेंट घातलं होतं. म्हणून अधिकाऱ्यांनी शोमध्ये पाठवण्यात आलं आणि वर्थुर संतोष याला ताब्यात घेतलं आहे…’ रिपोर्टनुसार, वर्थुर संतोष अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे.
यावर वर्थुर संतोष याने देखील त्याची भूमिका मांडली आहे. ‘मला वाघाच्या पंजाचं पेंडेंट पूर्वजांकडून मिळाला आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार, अधिकार्यांनी अधिक तपासासाठी पेंडेंट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहे. याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
गुन्ह्यासाठी होऊ शकते कठोर शिक्षा
वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत कोणत्याही प्राण्याचे अंग परिधान करणे किंवा त्याचं प्रदर्शन करणं दंडनीय गुन्हा आहे. संबंधीत कायदा हळूहळू नष्ट होत असलेल्या प्रजातींना कठोर संरक्षण प्रदान करतो. या गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
काय करतो वर्थुर संतोष?
बिग बॉस कन्नडचा स्पर्धक वर्थुर संतोष बेंगळुरूमध्ये गाय विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसायही आहे. संबंधीत प्रकरणामुळे वर्थुर संतोष वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.