Bigg Boss फेम जय दुधाणेच्या वडिलांचं निधन, कुटुंबावर दुःखाचा कोसळला डोंगर
Bigg Boss Jay Dudhane : 'मी माझा सुपरहिरो गमावला....', 'बिग बॉस' फेम अभिनेता जय दुधाणे यांच्या वडिलांचं निधन, सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्याने भावना केल्या व्यक्त, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जय याच्या पोस्टची चर्चा...
‘बिग बॉस फेम’ अभिनेता जय दुधाणे (Jay Dudhane) याच्या वडिलांचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या वडिलांचं नाव अनिल दुधाणे (Anil Dudhane) असं होतं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्डियाक अरेस्टमुळे जय दुधाणे याच्या वडिलांचं निधन झालं आहे. वडिलांचं निधन झाल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याची पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे.
जय दुधाणे याने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो पोस्ट करत मी माझा सुपरहिरो गमावला… अशी भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. जय दुधाणे याचे वडील अनिल दुधाणे यांच्या पार्थिवावर बुधवारी, 26 जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
View this post on Instagram
जय दुधाणे म्हणाला, ‘हे तुमच्यासोबत शेअर करेल असं कधी वाटलं देखील नव्हतं. 24 जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबियांसाठीच नाही तर, त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होते. ते नेहमी त्यांच्या प्रामाणिकपणा आणि आश्वासक वृत्तीसाठी ओळखले गेले.’
अभिनेता पुढे म्हणाला, ‘समाज कार्याची त्यांना आवड होती. त्यांनी कधीच पैशांसाठी मोह केला नाही. एक चांगला माणूस कसं बनता याईल हाच त्यांचा प्रयत्न असायचा…24 जून 2024 हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असेल कारण मी फक्त वडीलच गमावले नाहीत तर एक सच्चा मित्र, खरा पालक, खरा माणूस गमावला आहे… ‘असं देखील अभिनेता सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाला आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्याच्या पोस्टवर दुःख व्यक्त केलं आहे.
जय दुधाणे याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत काम करत आहे. ‘बिग बॉस’ मुळे देखील जय याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सोशल मीडियाावर जय कायम सक्रिय असतो.