हृतिक रोशनची पहिली पत्नी पुन्हा करणार लग्न? मोठी अपडेट समोर…

| Updated on: May 17, 2024 | 3:13 PM

Hrithik Roshan ex wife sussanne khan : हृतिक रोशनची पहिली पत्नी आणि दोन मुलांची आई सुझान खान वयाच्या 48 व्या वर्षी करणार दुसरं लग्न? मोठी अपडेट समोर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हृतिक याच्या पहिल्या पत्नीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

हृतिक रोशनची पहिली पत्नी पुन्हा करणार लग्न? मोठी अपडेट समोर...
Follow us on

अभिनेता हृतिक रोशन याची पहिली पत्नी सुझान खान तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. हृतिक रोशन याला घटस्फोट दिल्यानंतर सुझान अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अर्सनाल गोनी याचा भाऊ आणि अभिनेता अली गोनी याने अर्सनाल – सुझान यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अर्सनाल – सुझान यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुझान हिचे कौतुक करत अली गोनी म्हणाला, ‘सुझान माझ्या भावाची पार्टनर आहे यासाठी मी आनंदी आहे. सुझान आमच्या कुटुंबात सकारात्मक वातावरण घेऊन आली आहे. सुझान तिच्या कामात देखील अव्वल आहे. तिच्या प्रोफेशनल आयुष्यातील क्रिएटिव्हिटी मला प्रचंड आवडते. मला आनंद होत आहे की, सुझान माझ्या भावाच्या आयुष्यात आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

पुढे अभिनेत्री जास्मिल भसीन हिने देखील सुझान हिचं कौतुक केलं. शिवाय दोघांच्या लग्नाबद्दल देखील हिंट दिली. सुझान गोनी कुटुंबियांचा डार्लिंग आहे… असं जास्मिन म्हणाली. सुझान आणि मी एकमेकींना प्रोफेशनल आयुष्यात देखील सपोर्ट करतो…
गेल्या काही दिवसांपासून सुझान आणि अर्सनाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. पण दोघांपैकी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर सुझान आणि हृतिक यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण दोघे मुलांसाठी मात्र एकत्र येतात.

हे सुद्धा वाचा

घटस्पोटानंतर हृतिक याने सबा आझाद हिचा हात धरला तर, सुझान खान हिने अर्सनाल गोनी याचा हात धरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हृतिक आणि अर्सनाल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये देखील दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. नुकताच, मुलाचा जन्म देखील चौघांनी एकत्र साजरा केला.

महत्त्वाचं म्हणजे सुझान खान, अर्सनाल गोनी, सबा आझाद आणि हृतिक रोशन यांना देखील अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. हृतिक कायम सोशल मीडियावर सबा हिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. सबा आण हृतिक यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ट्विटरच्या माध्यमातून झाली.