Bigg Boss फेम अर्चना गौतम हिला मारहाण, खडतर होतं आयुष्य, कशी आली प्रसिद्धी झोतात?

Bigg Boss | अर्चना गौतम काँग्रेस कार्यालयाबाहेर मारहाण, एकेकाळी करायची 'या' ठिकाणी काम, सत्य कळल्यानंतर तिला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता... कशी झाली अर्चना गौतम हिच्या मॉडेलिंग करियरची सुरुवात... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना गौमत हिची चर्चा सुरु आहे.

Bigg Boss फेम अर्चना गौतम हिला मारहाण, खडतर होतं आयुष्य, कशी आली प्रसिद्धी झोतात?
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 8:21 AM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर अनेक जण प्रसिद्धी झोतात येतात. पण बिग बॉसमधील काही स्पर्धकांनी भूतकाळात अनेक वाईट गोष्टींचा सामना केलेला असतो. पण ‘बिग बॉस’ मुळे अनेकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस १६’ फेम अर्चना गौतम हिच्यासोबत देखील असंच झालं आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये वादग्रस्त वक्तव्यांमुळे अर्चना चर्चेत असायची. ‘बिग बॉस’ नंतर अर्चना ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील झळकली. आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केलेली अर्चना मेरठ याठिकाणी राहणारी आहे. देशभरात अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. म्हणून तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात.

दरम्यान, अर्चना आणि तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली आहे. ज्यामुळे अर्चना चर्चेत आली आहे. काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेस कार्यालयातच प्रवेश नाकारण्यात आला. उलट काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या काही महिलांनी त्यांना धक्काबुक्की केली. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांचं अभिनंदन करण्यासाठी ती आली होती. पण काँग्रेस कार्यलयाबाहेर अर्चना आणि तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली.

कोण आहे अर्चना गौतम?

मीडिया रिपोर्टनुसार, अर्चन गौतम हिने लहानपणी आर्थिक परिस्थितीचा सामना केला असल्याचं, खुद्द अर्चना हिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अर्चना लहानपणी देखील काम करायची. अर्चना गावात रिकामे सिलेंडर पोहोचवण्याचं काम करायची. ज्यासाठी तिला १० ते २० रुपये मिळायचे..

अर्चना गौतम हिची पहिली नोकरी..

अर्चना गौतम हिने सांगितलं की, २००८ मध्ये जेव्हा आमची परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हा मी रिकामे सिलिंडर पोहोचवत असे, जे मी सायकल किंवा बाईकवरून करायचे. याशिवाय अर्चना गौतमने कॉल सेंटरमध्येही काम केलं आहे. अभिनेत्रीने सांगितले की, माझे पहिलं काम टेलिकॉलिंग होतं. ज्यासाठी मला ६ हजार रुपये मानधन मिळायचं.

पुढे अर्चना म्हणाली, ‘नोकरीमुळे मला पैसे मिळू लागले. पण इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे त्यांनी मला काढून टाकलं.’ अर्चना हिच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर, आयआयएमटीमधून पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अर्चना गौतम हिची चर्चा रंगली आहे.

अर्चना हिचा मॉडेलिंगचा प्रवास

जेव्हा अर्चना हिने रवी-किशन शोमध्ये भाग घेतला, तेव्हा अर्चना हिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर यानंतर अर्चना गौतम हिने २०१८ मध्ये ‘मिस बिकिनी इंडिया’चा खिताब जिंकला. आज अर्चना हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील अर्चना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.