धर्माचं कारण देत फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने दुसऱ्यांदा दिली ‘गुड न्यूज’

इस्लाम धर्माचं कारण देत फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने चाहत्यांना दुसऱ्यांदा गुड न्यूज दिली आहे. सना दुसऱ्यांदा गरोदर असून सोशल मीडियावर तिने यासंदर्भातील पोस्ट लिहिली आहे. सनाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुलाला जन्म दिला होता.

धर्माचं कारण देत फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या सना खानने दुसऱ्यांदा दिली 'गुड न्यूज'
सना खान, अनस सय्यदImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 3:32 PM

बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये आणि ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये झळकलेली अभिनेत्री सना खान हिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट लिहिली असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. फिल्म इंडस्ट्रीत काही वर्षे काम केल्यानंतर सनाने ऑक्टोबर 2020 मध्ये ग्लॅमर विश्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. धर्माचं कारण देत तिने फिल्म इंडस्ट्री सोडली होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2020 रोजी मुफ्ती अनस सय्यदशी निकाह करत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सनाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता दीड वर्षांतच तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे.

कोण आहे सना खानचा पती?

गुजरातमधील सूरत इथला राहणारा मुफ्ती अनस सय्यद हा एक धार्मिक नेता आणि इस्लामिक विद्वान आहे. सनाची एजाज खानच्या माध्यमातून मुफ्तीशी भेट करून देण्यात आली होती. मुफ्ती अनस हा बिझनेसमनसुद्धा आहे. निकाहनंतर त्याने सनाला एक्सक्लुसिव्ह डायमंड रिंग भेट म्हणून दिली होती. सना खान तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळेही सतत चर्चेत असते. अनसशी लग्न केल्यानंतरही तिला अत्यंत महागड्या रेस्टॉरंटमध्ये आणि परदेशात विविध ठिकाणी फिरताना पाहिलं गेलंय.

हे सुद्धा वाचा

सनाने अभिनयक्षेत्र का सोडलं?

“माझ्याकडे नाव, प्रसिद्धी, पैसा हे सगळं होतं. मी काहीही करू शकले असते आणि मला हवं तसं राहू शकले असते. परंतु एक गोष्ट जी हरवली होती, ती म्हणजे मनाची शांती. माझ्याकडे सर्व काही असूनही मी आनंदी का नाही, असा प्रश्न मला पडायचा. मी नैराश्यात गेले होते,” असं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अनस सनापेक्षा 7 वर्षांनी लहान

अभिनेत्री रुबिना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये सनाने तिच्या आणि तिच्या पतीच्या वयातील अंतराबद्दल सांगितलं होतं. “एका मौलानाजींनी मला अनसचं स्थळ पाठवलं होतं. मी विचार केला की हे कसं शक्य होईल? कारण अनस माझ्यापेक्षा वयाने सात वर्षांनी लहान आहे. मी अनसलाही हाच प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने अत्यंत प्रेमाने मला समजावलं की हे लग्न का केलं पाहिजे? अनसला भेटण्याआधी मला असं वाटायचं की मौलाना खूपच बोरिंग असतात. कारण त्यावेळी मी अत्यंत आलिशान आयुष्य जगत होती. पण जेव्हा अनस त्याच्या एका दिवंगत मित्राबद्दल अत्यंत भावूक होऊन माझ्याशी बोलत होता आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दुआ मागत होता, तेव्हा माझे सर्व विचार बदलले. मी स्वत:लाच असा प्रश्न विचारला की या इंडस्ट्रीत माझा असा कोणी मित्र किंवा मैत्रीण आहे का, जी किंवा जो माझ्या निधनानंतर अशाप्रकारे विचार करू शकेल, माझ्याबद्दल प्रेमाने बोलू शकेल. तेव्हा मला जाणवलं की इथे माझं असं कोणीच नाही. अनसच्या माणुसकीमुळे मी त्याच्याकडे आकर्षित झाले.”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.