सापाच्या विषाची तस्करी प्रकरणात अडकलेल्या एल्विश यादव याच्या समर्थनार्थ शिव ठाकरे मैदानात, थेट…
एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडल्याचे सध्या बघायला मिळतंय.
मुंबई : बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. एल्विश यादव याच्यावर होत असलेले आरोप पाहून लोक हैराण झाले. एल्विश यादव याच्याकडून रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात येत. दिल्लीमध्ये अशाचप्रकारची पार्टी ठेवण्यात आली. इतकेच नाही तर या पार्टीसाठी विदेशातून मुली देखील मागवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. एल्विश यादव याच्यावर सतत आरोप केले जात आहेत.
या प्रकरणातच एल्विश यादव याच्याविरोधात गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. एल्विश यादव याच्यावर अनेकजण हे टीका करताना देखील दिसत आहेत. मात्र नुकताच एक कलाकार हा एल्विश यादव याच्या समर्थनार्थ मैदानात आल्याचे बघायला मिळतंय. शिव ठाकरे हा एल्विश यादव याला सपोर्ट करताना दिसत आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिव ठाकरे याने म्हटले की, जेंव्हा तुम्ही खूप पुढे निघून जाता त्यावेळी अशा गोष्टी होणे फार काही गंभीर नाहीये. मला वाटते की, हे खरे नाहीये. मी एल्विश यादव याचा व्हिडीओ देखील बघितला आहे, असे काहीच नाहीये. जेंव्हा काही गोष्टी तुम्ही मिळवता तेंव्हा काही लोकांना हे आवडत नाही.
पुढे शिव ठाकरे हा म्हणतो की, मला मुळात सर्व गोष्टी अजून माहिती नाहीत. मुळात म्हणजे झालेल्या आरोपांनंतर एल्विश यादव याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत थेट सांगितले की, माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. माझा या गोष्टींचा काहीच संबंध नाहीये, जर माझी यामध्ये एक टक्का देखील चूक सापडली तर मी संपूर्ण जबाबदारी स्वीकारेल.
सध्या पोलिस हे एल्विश यादव याचा शोध घेत आहेत. या रेव्ह पार्टीतील इतर पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एल्विश यादव याचा शोध अजूनही सुरूच आहे. एल्विश यादव याला पोलिस चार राज्यात शोधत असल्याचे सांगितले जातंय. मात्र, एल्विश यादव हा विदेशात पळून गेल्याची देखील जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.