Bigg Boss 14 | घरात एकच व्यक्ती ‘टार्गेट’ होतेय, रुबिना दिलैकच्या चाहत्यांची तीव्र नाराजी

रुबिना दिलैक हिने काही दिवसांपूर्वी बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. तर, आता रुबिना दिलैकच्या चाहत्यांनी देखील बिग बॉसवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Bigg Boss 14 | घरात एकच व्यक्ती ‘टार्गेट’ होतेय, रुबिना दिलैकच्या चाहत्यांची तीव्र नाराजी
Follow us
| Updated on: Nov 01, 2020 | 7:49 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss 14) पर्व सध्या जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. रुबिना दिलैक हिने काही दिवसांपूर्वी बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. तर, आता रुबिना दिलैकच्या चाहत्यांनी देखील बिग बॉसवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रुबिना दिलैकला बिग बॉसच्या घरामध्ये टार्गेट केलं जात आहे. आणि हे टार्गेट दुसरं तिसरं कोणी करत नसून, स्वत: बिग बॉस करत आहेत. (Bigg Boss House Rubina Dilaik Targeted Fans Angry) खरोखरच बिग बॉसच्या घरामध्ये भेदभाव केला जात आहे का? रुबिना दिलैक ही गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवरील मालिकेत राज्य करते आहे. ती अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉसच्या घरात जेव्हा रुबिना दिलैकला टार्गेट केल जात आहे. तेव्हा तिच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तिचे लाखो चाहते संतापले आहेत. संतापलेले चाहते आता सलमान खान आणि बिग बॉसवर भेदभाव करत असल्याचा आरोप करत आहेत. रुबिना दिलैकचे सर्व चाहते सोशल मीडियावर एकत्र आले आहेत.

काय आहे नेमक प्रकरण

रुबिना दिलैक जे वागत आहे, ते घरातील सदस्यांना आवडत नाहीये. याबाबत बऱ्याचवेळा सलमान खानने तिला सांगितले आहे. रुबिना दिलैक ही घरातील अशी सदस्य आहे, की ती नेहमीच तिचे मत व्यक्त करत असते. अनेक विषयावरून सलमान खान आणि तिचे खटकेही उडाले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये ती स्वत:चे एक बिग बॉस चालवत असल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात आला आहे. वींकेड का वारमध्ये अनेक विषयावरून सलमान खानने तिला झापले होते. जैस्मिन भसीन आणि निशांत मलकानीला रुबिना दिलैकची कठपुतली आहेत, असेही म्हणात आले होते. बिग बॉसच्या घरामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरण सुरू झाले आहे. पवित्रा पुनियाला एजाज खान आवडत आहे. कविता कौशकला बोलताना पवित्रा पुनिया सांगते की, मला एजाज खान आवडतो, पण माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय आहे, ते मला माहिती नाही. एजाज खानला पवित्राच्या नावाने निक्की तांबोळी, जान कुमार सानू, कविता कौशिक चिडवताना दिसतात.

कविता कौशिक एजाज खान पवित्रा पुनियाबद्दल बोलते आणि सांगते की, पवित्रा पुनियाला तु आवडतो. यावर एजाज खान सरळ म्हणतो की, आमच्या दोघांच्या नात्याबद्दल तुला माहिती आहे, तिचे आणि माझे किती भांडण होतात आणि मला पवित्रा पुनिया आवडत नाही. त्यानंतर कविता कौशिक एजाज खानला फोर्स करते. पण तो सरळ म्हणतो की, मी इथे फक्त खेळण्यासाठी आलो आहे. मला माझे लक्ष फक्त खेळावर ठेवायचे आहे. मी येताना इथे एकटा आलो होतो आणि जाताना पण एकट्यालाच जायचे आहे. मी प्रेमाच्या भानगडीत पडलो तर सर्व विसरून जातो, असे म्हणत पवित्र पुनिया आपल्याला आवडत नसल्याचे त्याने सांगितले.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानकडून स्पर्धकांची शाळा!

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नेपोटिझमचे वादळ, राहुल वैद्य-जान कुमार सानूमध्ये खडाजंगी!

(Bigg Boss House Rubina Dilaik Targeted Fans Angry)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.