वर्षा उसगांवकर यांच्यावर ‘या’ गोष्टीसाठी प्रचंड दबाव, अत्यंत मोठा खुलासा, अभिनेत्री म्हणाली…

अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी 5 मध्ये दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घराच धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.

वर्षा उसगांवकर यांच्यावर 'या' गोष्टीसाठी प्रचंड दबाव, अत्यंत मोठा खुलासा, अभिनेत्री म्हणाली...
Varsha Usgaonkar
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 1:03 PM

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महाभारत मालिकेत काम देखील केले. मालिकेच्या सेटवरच त्या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या. हेच नाही तर वर्षा उसगांवकर आणि नितिश भारव्दाज हे लग्न करणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र, काही वर्ष यांचे अफेअर सुरू होते आणि त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. वर्षा उसगांवकर यांनी फक्त मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही जबरदस्त भूमिका केल्या. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही मोठा आहे. वर्षा उसगांवकर यांचे खासगी जीवन कायमच चर्चेत राहिले आहे. वर्षा उसगांवकर यांच्या सासऱ्याकडून त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर गंभीर आरोपही करण्यात आले.

आता वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी 5 मध्ये दाखल झाल्या आहेत. सुरूवातीला सर्वांनाच वाटत होते की, वर्षा उसगांवकर या बिग बॉसमध्ये सहभागी होणार नाहीत. मात्र, सर्वांना धक्का देत वर्षा उसगांवकर यांनी बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना देखील दिसत आहेत.

वर्षा उसगांवकर या बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून त्यांचे खासगी आयुष्य हे चांगलेच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. वर्षा उसगांवकर यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये वर्षा उसगांवकर या त्यांच्या लग्नाबद्दल खुलासे करताना दिसल्या होत्या. हेच नाही तर पहिल्यांदाच त्या लग्नाबद्दल बोलल्या.

वर्षा उसगांवकर यांनी सांगितले की, मला लग्नासाठी प्रचंड दबाव होता. मला लग्न इतक्या लवकर करायचे नव्हते. मात्र, माझे घरचे लग्नासाठी माझ्या मागे लागले होते. माझ्या बहिणीचे पण लग्न झाले होते. यामुळेच त्यांना वाटत होते की, मी लवकर लग्न करावे. मात्र, माझी त्यावेळी लग्न करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. घरच्यांचा दबाव असल्याने मला लग्न करावे लागले.

माझ्या लग्नाचीही काहीच चर्चा त्यावेळी नसल्याचे देखील वर्षा उसगांवकर यांनी म्हटले आहे. बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी हिने थेट एका टास्कवेळी म्हटले होते की, आईची माया तुम्हाला कशी समजणार? निकी तांबोळी हिच्या या विधानानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी या प्रकारानंतर निकी तांबोळी हिच्यावर टीका करण्यास देखील सुरूवात केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.