Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निक्की तांबोळीसोबतची जवळीक पाहून अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची पोस्ट; म्हणाली..

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात अरबाज आणि निक्की यांची जवळीक पाहून आता अरबाजच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने नेटकऱ्यांना एक विनंती केली आहे. बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती.

निक्की तांबोळीसोबतची जवळीक पाहून अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची पोस्ट; म्हणाली..
अरबाज पटेल, लिझा बिंद्रा, निक्की तांबोळीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 9:58 AM

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सिझन सध्या चांगलंच चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी या दोघांच्या नात्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासूनच एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. दुसरीकडे बिग बॉसच्या घराबाहेर अरबाज हा लीझा बिंद्रा नावाच्या एका मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोघांचे मिठी मारतानाचे आणि किस करतानाचेही व्हिडीओ आहेत. निक्कीबद्दल अरबाजच्या मनात असलेल्या भावनांवरून सूत्रसंचालक रितेश देशमुखनेही त्याची चांगलीच शाळा घेतली होती. यावेळीही रितेशने अरबाजच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला होता. निक्कीसोबत अरबाजच्या जवळीकच्या चर्चेदरम्यान आता लिझाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, ‘मित्रमैत्रिणींनो.. कृपा करून अरबाजच्या बाबतीत मला मेसेज किंवा कमेंट करू नका.’ बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्की यांच्यातील जवळीक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लिझाला टॅग करण्यास सुरुवात केली होती. त्यालाच वैतागून लिझाने अशी पोस्ट लिहिल्याचं कळतंय. लिझाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरबाजसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ पहायला मिळतात. इतकंच नव्हे तर एका पोस्टमध्ये तिने अरबाजला ‘पती’ असं म्हटलंय. ‘माझा पती आहे, पण अद्याप आम्ही लग्न केलं नाही’, असं लिहित तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

हे सुद्धा वाचा

‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये रितेश देशमुखनेही अरबाजला निक्कीवरून सुनावलं होतं. बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी लव्ह अँगलचा वापर करू नकोस, असं त्याने खडसावलं होतं. अरबाज हा रिअॅलिटी शो स्टार आणि स्प्लिट्सविलाचा माजी स्पर्धक आहे. त्याचे अनेक म्युझिक अल्बमदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या निक्की तांबोळीसह अनेक मुलींना अरबाजने आपल्या लूकने घायाळ केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by leeza bindra (@leezabindra)

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी तो म्हणाला होता, “स्प्लिट्सविलामध्ये असताना 95 दिवस मी फोन आणि सोशल मीडियापासून दूर होतो. आता इथे पण मी फोन, सोशल मीडियापासून दूरच असणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं मी ठरवलं तेव्हा माझ्या आईला अश्रू अनावर झाले होते. आता मला ‘बिग बॉस’मध्ये पाहतानाही आईला रडू येत असेल. मी घरात जाण्याआधी शेवटचा फोनदेखील आईला केला होता. आता आई आणि माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्या घरातला मी कर्ता मुलगा आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही माझंच अधिराज्य असणार.”

कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद.
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला.
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला.
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद.
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल.
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?
कामराच्या शोच्या सेटची शिवसेनेकडून तोडफोड, सर्व शो बंद; प्रकरण काय?.
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.