Bigg Boss Marathi 5: आमने – सामने येणार निक्की – अरबाज, शेवटच्या दिवशी घरात काय होणार?
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस'च्या घरात शेवटच्या दिवशी आमने - सामने येणार निक्की - अरबाज, घरात येणार नवा ट्विस्ट, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस मराठी 5' च्या फिनालेची चर्चा...
Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’ शोचा पाचवा पर्व आता अंतिम टप्प्यात आहे. वर्षा उसगांवकर यांनी शोचा निरोप घेतल्यानंतर ‘बिग बॉस 5’ शोला टॉप 6 स्पर्धत भेटले आहेत. अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी… या 6 स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायलं मिळणार आहे. पण विजेता घोषित होण्याआधी ‘बिग बॉस’च्या शेवटच्या दिवशी निक्की आणि अरबाज आमने – सामने येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता शोच्या शेवटच्या दिवसाकडे लागल्या आहेत.
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या घरातील निक्की आणि अरबाज यांची केमिस्ट्री अनेकांना आवडली. अरबाजने शोचा निरोप घेतल्यानंतर निक्की प्रचंड भावूक देखील झाली. दरम्यान, निक्की आणि अरबाज यांच्या नात्याची चर्चा सुरु असताना, मझी बाहेर गर्लफ्रेंड आहे… अशी कबुली अरबाज याने दिली होती. पण शोमध्ये निक्की-अरबाजमधील वाद मिटले आणि दोघांमधील जवळीक वाढली.
View this post on Instagram
‘बिग बॉस’च्या घरातील फॅमिली वीक
अरबाज याने शोचा निरोप घेतल्यानंतर निक्कीचे आई-वडील तिला भेटण्यासाठी आले होते. तेव्हा अरबाज याचा साखरपुडा झाल्याचं समजलं आहे… असं निक्कीच्या आईने तिला सांगितलं. तेव्हा निक्की हिने देखील रागात अरबाजचं सर्व सामान फेकून दिलं आणि यापूढे अरबाज याच्यासोबत कोणताच संबंध ठेवणार नाही.. असं देखील निक्की म्हणाली होती.
यावर अरबाज याने स्पष्टीकरण देखील दिलं होत. माझा साखरपुडा झालेला नाही. शो संपल्यानंतर निक्की बाहेर येईल तेव्हा तिला सर्व काही सांगेल… असं अरबाज म्हणाला होता. अखेर घडलेल्या अनेक गोष्टींनंतर निक्की – अरबाज अखेर आमने – सामने आले आहेत. फिनालेला एक दिवस उरलेला असताना अरबाज आणि इतर स्पर्धकांनी देखील घरात एन्ट्री केली. अशात अरबाज याला पाहाताच निक्की नाराज होते. दोघांमध्ये बेडरुन एरियामध्ये संवाद देखील रंगतो. यावेळी निक्की आईने सांगितलेल्या सर्व गोष्टींचा जाब विचारताना दिसणार आहे. त्यामुळे अरबाज आता निक्की हिला काय सांगतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.