रितेश देशमुख याने केले ‘या’ अभिनेत्रीचे काैतुक, म्हणाला, ती खरोखरच…
बिग बॉसच्या घरात धमाका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिग बॉस मराठी सीजन 5 ला रितेश देशमुख हा होस्ट करतोय. रितेशचा अंदाजा चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसतोय. यंदाच्या सीजनमध्ये अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये पोहोचले आहेत.
बिग बॉस मराठीचे हे सीजन धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ नक्कीच आहे. पुढील काही दिवसांमध्ये घरात मोठे हंगामे होणार असल्याचे सातत्याने सांगितले. नुकताच आता बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी रितेश देशमुख याने घरातील अनेक सदस्यांचा क्लास लावला. आर्यापासून ते अंकितापर्यंत सर्वांना खडेबोल सुनावताना रितेश दिसला. या आठवड्यात दोन टीम घरात बघायला मिळाल्या असल्याचे देखील रितेश देशमुख याने म्हटले. एकीकडे निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत तर दुसरीकडे अख्ये घर असे दोन ग्रुप बघायला मिळाले.
आर्या आणि अंकिता यांचा संपूर्ण गेम हा नक्कीवर अवलंबून असल्याचे रितेश देशमुख याने म्हटले. आर्या आणि अंकिता यांचे असे झाले आहे की, निकीच्या विरोध जे कोणी आहेत ते आपले मित्र. आर्या आणि अंकिता फक्त निकीच्या गेममुळे दिसत असल्याचेही रितेश देशमुख याने म्हटले. यासोबत त्याने अरबाजला देखील खडेबोल सुनावले.
रितेश देशमुख म्हणाला की, अरबाजचे ऐकून संपूर्ण घर निकी आणि अभिजीत सावंतच्या विरोध गेले. निकी आणि अभिजीतला सतत टोमणे मारले जात होते. निकी तुम्हाला प्रतिउत्तर देत आणि अभिजीतने हे सर्व सहन केले. अख्ये घर निकी आणि अभिजीतच्या विरोधात होते. या आठवड्यात फक्त निकीमुळेच घर चालल्याचे देखील रितेश देशमुख याने म्हटले.
सर्वजण आपल्या विरोधात असताना देखील निकीने चांगला गेम खेळल्याचे रितेशने म्हटले. पुढे रितेश देशमुख म्हणाला की, अभिजीत किचनमध्ये पोळ्या भाजत होता. त्याच्या बाजूला निकी होती. यावेळी नेहमीप्रमाणे निकी आणि अरबाज यांच्यामध्ये वाद झाला. कारण नसताना देखील अरबाज हा अभिजीतला सुनावत होता.
यावेळी अभिजीत याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, काही नात्यांना चुकीच्या बाजूने नका बघू. बिग बॉसच्या घराच्या बाहेर माझे एक वेगळेच जग आहे आणि माझे लग्नही झाले. अभिजीतकडून हे सांगितल्या गेल्यानंतरही अरबाज याची बडबड सुरू असल्याचे रितेशने म्हटले. या आठवड्यात संपूर्ण घर निकी आणि अभिजीत यांना टार्गंट करताना दिसले.