जान्हवी किल्लेकर हिने केले पॅडी कांबळेबद्दल खळबळजनक विधान, थेट म्हणाली, संपूर्ण करिअरमध्ये…
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. वर्षा उसगांवकर या सीजनमध्ये सहभागी झाल्या आहेत. रितेश देशमुख या सीजनला होस्ट करताना दिसतोय. पुढीला काही दिवसांमध्ये हे सीजन धमाका करेल असेही सांगितले जातंय.
बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा हंगामा होताना दिसतोय. विशेष म्हणजे या सीजनने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळतंय. रितेश देशमुख याच्या होस्टिंगचेही काैतुक केले जातंय. अनेक दिग्गज कलाकार हे बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत. या सीजनकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क झालाय. या टास्कमध्ये नेहमीप्रमाणे दोन टीम या बघायला मिळाल्या. टास्कमध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा झाला. हेच नाही तर यावेळी जान्हवी किल्लेकर आणि पॅडी कांबळे यांच्यात मोठा वाद बघायला मिळाला.
दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसल्या. शेवटी टास्क झाला आणि या टास्कमध्ये कोणीही जिंकले नाही. बिग बॉसकडून स्पष्ट करण्यात आले की, दोन्ही टीमला झिरो पॉईंट मिळाले आहेत आणि याचे गंभीर परिणाम उद्यापासून दोन्ही टीमला भोगावे लागतील. यानंतर पुढे बिग बॉसच्या घरात राडा होताना दिसतोय.
जान्हवी आणि पॅडीमध्ये वाद होतो. यावेळी जान्हवी ही थेट म्हणाली की, पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अॅक्टिंग करून थकले आहेत. मात्र, घरातील सदस्यांना जान्हवी हिचे पॅडी कांबळेच्या करिअरबद्दल बोलणे अजिबातच आवडले नाही. यावेळी पॅडीही जान्हवीबद्दल बोलताना दिसले.
थोड्यावेळात तिथे आर्या येते. तू पॅडी दादांच्या करिअरबद्दल काय बोलली ते परत बोल बोलते. यादरम्यान आर्या आणि जान्हवीमध्ये वाद बघायला मिळतो. पॅडी कांबळे येऊन जान्हवीला घेऊन जातो. मात्र, जान्हवी हिचे हे विधान ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. आता जान्हवी हिच्यावरही लोक टीका करताना दिसत आहेत.
जान्हवी किल्लेकर हिने पॅडीच्या करिअरबद्दल भाष्य केल्यानंतर लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. कोणाच्याही करिअरबद्दल असे बोलणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. आता हा वाद वाढताना दिसतोय. रितेश देशमुख या मुद्दावरून जान्हवीचा क्लास लावणार हे देखील स्पष्ट आहे.