Bigg Boss Marathi 5: ‘चिमुकल्यामुळं 35 वर्ष सत्तेत असलेला आमदार पडला’, छोट्या पुढारीचा दावा
Bigg Boss Marathi 5: छोट्या पुढारीचं भाषण जनतेला भावलं आणि 35 वर्ष सत्तेत असलेला आमदार पडला... 'बिग बॉस'च्या छोट्या पुढारीचा मोठा दावा, 'बिग बॉस'च्या घरात सध्या फक्त छोट्या पुढारीचा बोलबाला...
Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या भागाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या भागात एकापेक्षा एक स्पर्धक असल्यामुळे प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन होणार… यात काही शंका नाही. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या भागात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे छोटा पुढारी घनश्याम दरवडे याने… ‘बिग बॉस’च्या छोटा पुढारी याने केलेला दावा सध्या चर्चेत आहे. ‘माझ्या एका भाषणामुळे 35 वर्ष सत्तेत असलेला आमदार पडला…’ असा दावा छोटा पुढारी याने केला.
घरातील इतर सदस्यांसोबत बोलत असताना छोटा पुढारी याने मोठा दावा केला. छोटा पुढारी म्हणाला, ‘मी जनतेचा पुढारी आहे. माझ्यामुळे आमच्याच तालुक्यातला एक आमदार पडला. माझं भाषण झालं होतं. माझं भाषण लोकांना इतकं भावलं की मीडियाने नंतर ते उचलून धरलं… त्यानंतर 35 वर्ष सत्तेत असलेल्या आमदाराला चिमुकल्याने पाडलं…’ असं छोटा पुढारी म्हणाला..
छोटा पुढारी याने केलेल्या दाव्यानंतर अभिनेत्री वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘त्यामुळे झालं काय?’ यावर छोटा पुढारी म्हणाला, ‘माझ्या गावचा रस्ता चांगला झाला. पाणी आलं… माझ्या गावापर्यंत एसटी येऊ लागली…’ असं देखील छोटा पुढारी म्हणाला.. सध्या छोटा पुढारी याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या भागाची सुरुवात झाल्यामुळे स्पर्धक आपली ओळख इतर स्पर्धकांना करुन देत आहेत. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरात येणाऱ्या पुढील ट्विस्ट काय होणार? हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात छोटा पुढारी याचे वक्तव्य आणि निक्की तांबोळी – अरबाज पटेल यांच्यातील केमिस्ट्री चर्चेत आहे. शिवाय शोच्या नव्या प्रोमोमध्ये छोटा पुढारी याने निक्की हिला वहिनी म्हणून हाक मारली. तेव्हाच अरबाज म्हणाला, ‘थांब रे सकाळी सकाळी कायम म्हणतो तू…’ पुढे छोटा पुढारी म्हणतो, ‘तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय…चहा उतू गेला, तर काही बिघडत नाही…’ त्यामुळे ‘बिग बॉस’ च्या घरात निक्की – अरबाज याची जोडी जमणारा का? अशी देखील चर्चा सुरु आहे.