निकी तांबोळी हिने केला थेट तिच्या आई वडिलांबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, माझे…

| Updated on: Oct 10, 2024 | 1:19 PM

Nikki Tamboli : बिग बॉसचा फिनाले झाला असून सूरज चव्हाण हा विजेता ठरलाय. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या घरात धमाका करताना दिसली आहे. विशेष म्हणजे टॉप 3 पर्यंत जाण्यास निकी तांबोळी हिला यश मिळाले. निकी सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

निकी तांबोळी हिने केला थेट तिच्या आई वडिलांबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, माझे...
Nikki Tamboli
Follow us on

बिग बॉस मराठीचा फिनाले झालाय आणि बिग बॉस मराठी सीजन 5 ला आपला विजेता देखील मिळाला. 70 दिवसांच्या प्रवासानंतर सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीचा ताज मिळालाय. लोक सूरज चव्हाण याच्यावर काैतुकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना सूरज दिसला. बारामतीचा असलेला सूरज याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सूरज चव्हाण, निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत हे बिग बॉस मराठीच्या टॉप 3 मध्ये पोहोचले. त्यानंतर निकी तांबोळी ही विजेतेपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडली. निकी तांबोळी हिच्यावर सीजन सुरू असताना जोरदार टीका करण्यात आली.

जवळपास घरातील सर्वच सदस्यांसोबत निकी तांबोळी हिचे वाद झाले. हेच नाही तर तिने घरात काम करण्यास देखील मनाई केली. मात्र, बऱ्यापैकी लोकांना निकीचा गेम आवडताना दिसला. चाैथ्या फेरीमध्ये घरातील सदस्यांना रितेशने सांगितले की, तुम्ही या फेरीत तुमच्या घरातील एका सदस्याला बोलू शकता. निकी तांबोळी हिचे आई आणि वडिल दोघेही फिनालेसाठी पोहोचले होते.

यावेळी रितेशने विचारले की, निकी आई आणि वडिलांपैकी तू कोणाला बोलू इच्छिते. यावर निकी तांबोळी म्हणाली की, मी माझ्या आईला बोलू इच्छिते. कारण माझे वडील खूप जास्त भावनिक आहेत आणि काहीही झाले तरी त्यांच्या डोळ्यात लगेचच पाणी येते ते हळवे आहेत. माझी आई तशी नाहीये. ती खूप जास्त खंबीर आहे.

यामुळेच मी या फेरीसाठी माझ्या आईला बिग बॉसच्या घरात बोलावते. पहिल्यांदाच निकी तांबोळी ही आपल्या आई वडिलांबद्दल खुलासा करताना दिसलीये. आता निकी तांबोळी हिच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. निकी तांबोळी हिला अजून एक भाऊ होता. मात्र, कोरोनाच्या वेळी निकी तांबोळीच्या भावाचे निधन झाले.

निकी तांबोळी हिचा भाऊ वारल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक तशी पोस्टही शेअर केली होती. भावाच्या निधनाचा मोठा धक्का निकी तांबोळीला बसला होता. फक्त बिग बॉस मराठीच नाही तर बिग बॉस हिंदीमध्येही धमाका करताना निकी तांबोळी यापूर्वी दिसली आहे. निकी तांबोळी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.