…तर मी तुला घरात येऊन बाहेर काढेल, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सूरजला असं का म्हणाला

| Updated on: Aug 04, 2024 | 12:50 PM

बिग बॉस मराठी सीझन 5 हे सध्या चांगलेच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे हे सीजन चांगलाच धमाका करताना दिसत आहे. रितेश देशमुख या सीजनला होस्ट करताना दिसतोय. बिग बॉस सुरू होऊन काही दिवसच झाले नाहीत तोवरच बिग बॉसच्या घरात मोठे वाद होताना दिसत आहेत.

...तर मी तुला घरात येऊन बाहेर काढेल, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सूरजला असं का म्हणाला
Riteish Deshmukh
Follow us on

बिग बॉस मराठी सीझन 5 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या या सीझनमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहे. यावेळीच्या सीझनला महेश मांजरेकर हे होस्ट करताना दिसत नाहीयेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीझन 5 ला होस्ट करत आहे. रितेश देशमुखचा अंदाज लोकांना आवडताना देखील दिसतोय. निक्की तांबोळी ही बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धेक दिसत आहे. नुकताच रितेश देशमुख याने निक्की तांबोळी हिचा चांगलाच क्लास लावला. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीमध्ये घरात जोरदार वाद होताना दिसत आहे. 

बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये बारामतीचा प्रसिद्ध रीलस्टार सूरज चव्हाण हा देखील सहभागी झालाय. मात्र, सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात शांत बसताना जास्त दिसला. त्याची बोलण्याची पद्धत वेगळी असल्याने कोणी आपल्याला काही बोलेल यामुळे तो घरात शांत राहत होता. मात्र, त्यानंतर बिग बॉसने त्याला काही गोष्टी समजावून सांगितल्या.

सूरज चव्हाण याने घरातील सदस्यांना थेट इशारा देत सांगितले की, आपल्याला आता हा बिग बॉसचा खेळ लक्षात आलाय. नुकताच सूरज चव्हाण हा रितेश देशमुख याला बोलताना म्हणाला की, आता आपल्याला समजले कसे खेळायचे ते…कोणी आपल्या नादाला लागले की, आता बुक्की ठेऊन देणार…सूरज चव्हाण याचे हे बोलणे ऐकून रितेश देशमुख याला देखील धक्का बसला.

लगेचच रितेश देशमुख हा सूरज चव्हाण याला म्हणतो की, तू जर असे केले तर मी स्वत: तूला घरात येऊन बाहेर काढेल. आता याच विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. एकप्रकारे रितेश देशमुख याने सूरज चव्हाण याला इशारा देत थेट म्हटले की, जर घरात मारहाण केली तर घरातून बाहेर काढले जाईल.

सूरज चव्हाण याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे आता तो चांगला गेम बिग बॉसच्या घरात खेळताना नक्कीच दिसतोय. सूरज चव्हाण याला चांगले मानधनही बिग बॉसच्या घरात मिळताना दिसत आहे. एका दिवसाला 30 ते 50 हजार रूपये बिग बॉसच्या घरात राहायचे सूरज चव्हाण याला मिळत असल्याचे सांगितले जातंय.