Bigg Boss Marathi 5: सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट लीक, होणार ‘बिग बॉस’च्या घराचा मालक?
Bigg Boss Marathi 5: 'शो संपल्यावर मी बाहेर जाऊन...', सूरज चव्हाणचं मोठं सिक्रेट फिनाले आधीच, शो संपल्यानंतर काय करणार सूरज, होणार 'बिग बॉस'च्या घराचा मालक? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूरज चव्हाण याची चर्चा...
Suraj Chavan Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी 5′ च्या घरातील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा प्रवास तब्बल 67 दिवसांनी संपल्यानंतर ‘बिग बॉस’ शोचे टॉप 6 स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी… या 6 स्पर्धकांमध्ये आता चुरशीची लढत पाहायलं मिळणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाचा विजेता कोण असेल… .याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण ‘बिग बॉस मराठी 5’ शोच्या फिनाले आधिक सूरज चव्हाण याचं मोठं सिक्रेट लीक झालं आहे.
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी 5’ शो आता अंतिम टप्प्यात आहे. फिनाले पूर्वी बिग बॉसने घरातील स्पर्धकांचा प्रवास दाखवला. यावेळी बिग बॉसच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं. स्पर्धक सूरज याचा प्रवास देखील डोळ्यात पाणी आणणारा होता.
View this post on Instagram
बिग बॉसने शेवटचा आठवड्यात स्पर्धकांचा प्रवास दाखवल्यानंतर सूरज याने देखील स्वतःचं मोठं सिक्रेट सांगितलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर सूरज स्वतःचं घर बांधणार आहे. स्वतःचं स्वप्नातील एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर सूजर स्वतःचं घर बांधणार आहे.
स्वतःचा प्रवास पाहिल्यानंतर सूरज भावूक होत म्हणाला, ‘आपले आई – बाप असेल तर जीवन आहे नाहीतर काहीही नाही… कोणी कोणाला विचारत नाही. मी कोणत्या परिस्थितीतून आलोय हे फक्त माझं मला माहिती आहे… . देवीच्या जत्रेला गेल्यावर लोक नावं ठेवायचे, काही बोलायचे पण, आता सगळं बदललं आहे..’
पुढे सूरज म्हणाला, ‘बिग बॉसने मला फार मोठी संधी दिली आहे. या संधीचं मी नक्कीच सोनं करेल… मी बिग बॉसला कधीत विसरणार नाही. शो संपल्यानंतर बाहेर जाऊन मी माझं घर बांधणार आहे. माझ्या घराला मी ‘बिग बॉस’ असं देणार नाव देणार आहे…. झापुक झुपूक बिग बॉस गुलीगत…बुक्कीत टेंगूळ आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार.’ असं देखील सूरज यावेळी म्हणाला.