‘राज ठाकरेंना सर्वांत आधी लग्नाची बातमी..’; ‘कोकण हार्टेड गर्ल’चा खुलासा

कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने नुकतीच सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली. संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी ती लवकरच लग्न करणार आहे. या लग्नाची बातमी तिने सर्वांत आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सांगितली.

'राज ठाकरेंना सर्वांत आधी लग्नाची बातमी..'; 'कोकण हार्टेड गर्ल'चा खुलासा
अंकिता वालावलकर, कुणाल भगत, राज ठाकरेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 10:03 AM

‘बिग बॉस मराठी 5’ फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ऊर्फ ‘कोकण हार्टेड गर्ल’ने नुकतीच प्रेमाची जाहीर कबुली दिली. बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवण्याआधी तिने प्रियकरासाठी खास पोस्ट लिहिली होती. आता शो संपल्यानंतर तिने प्रियकरासोबतचा फोटो शेअर करत लग्नाची घोषणा केली आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्याशी ती लवकरच लग्न करणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित जाहीरपणे प्रेम व्यक्त केलं. अंकिताने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नाची बातमी सर्वांत आधी कोणाला सांगितली, याविषयी ती या व्हिडीओत सांगताना दिसतेय.

या व्हिडीओत अंकिता म्हणते, “तुम्ही सर्वांनी बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास पाहिला. मी खूप जास्त भावनिक मुलगी आहे. जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हा एक गोष्ट तुम्हाला सांगते. आमच्या दोघांचे बरेच गुण जुळतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा गुण जुळला तो म्हणजे आमच्या भावना. त्या भावनांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे माननीय राज ठाकरे. काही दिवसांपूर्वी ‘येक नंबर’ या चित्रपटाचं काम सुरू होतं. कुणाल या चित्रपटासाठी काम करत होता. त्यादरम्यानच आम्ही राज ठाकरेंना सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी सांगितली होती. आम्ही गुढीपाडव्यालाच राज साहेबांना लग्नाबद्दल सांगितलं होतं. पण त्यानंतर बिग बॉस मराठीमुळे सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या.”

हे सुद्धा वाचा

‘प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगितलंस. काळाच्या ओघात कळलच नाही, आयुष्य कसं कुठे बदललं? तू भेटलास आणि पुन्हा जगावंसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन,’ अशा शब्दांत अंकिताने भावना व्यक्त केल्या होत्या. अंकिता आणि कुणाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांवर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अंकिता ही सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय आहे. 2016 मध्ये ती करिअरसाठी मुंबईत आली आणि इथे तिने स्वत:ची वेगळी ओळख बनवली. अंकिताने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. या शोमधील तिची खेळी सर्वांनाच खूप आवडली. टॉप 5 स्पर्धकांपर्यंत ती पोहोचली होती. मात्र या सिझनचं विजेतेपद पटकावण्यात सूरज चव्हाण यशस्वी ठरला.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.