‘बिग बॉस मराठी सीजन ५’चा किंग बारामतीचा सूरज चव्हाण, कोण ठरला उपविजेता? जाणून घ्या
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Live Event Updates : बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले नुकताच झाला असून सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता झालाय. सूरजवर काैतुकांचा वर्षाव केला जातोय. अखेर रितेशने सूरजच्या नावाची घोषणा केलीये.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले झालाय. टॉप 2 फायनलिस्टपर्यंत अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे पोहोचले. निकी तांबोळी ही बिग बॉसच्या टॉप 3 मधून बाहेर पडली. आता बिग बॉस मराठी सीजन 5 ला त्याचा विजेता मिळालाय. सूरज चव्हाण हा ज्यावेळी बिग बॉसच्या घरात दाखल झाला. त्यावेळी अनेकांनी भूवया उंचावल्या. सूरज चव्हाण अत्यंत साधा दिसतो. अस्सल ग्रामीण भागातून सूरज आलाय. सुरूवातीच्या काळात सूरजच्या खाण्यावरून आणि राहण्यावरून बिग बॉसच्या घरातील काही सदस्य त्याची खिल्ली उडवताना दिसले. आता तोच सूरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरलाय.
सूरज चव्हाण हा मुळ बारामतीचा असून तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. सूरजच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तो लहान असतानाच त्याच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्याकडे राहण्यासाठी साधे घर देखील नाहीये. सूरजवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केल्याचे बघायला मिळाले. भरपूर मत लोकांनी त्याला दिली.
सूरज चव्हाण याचे शिक्षणही अत्यंत कमी झाले असून त्याला मराठी देखील वाचता येत नाही. सूरज चव्हाणची तरूणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ ही बघायला मिळते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ तयार करत ग्रामीण भागातील मुले सूरज याला मत देण्यासाठी विनंती करत होते आणि आता सूरज चव्हाण हाच बिग बॉसचा विजेता ठरलाय.
सूरज चव्हाण याला बिग बॉसकडून 14 लाख रूपयांचे मिळाले. सूरज चव्हाण विजेता ठरला तर उपविजेता अभिजीत सावंत हा ठरलाय. दोघेही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसले. सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी धमाकेदार पद्धतीने प्रेम दिल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात सूरज टास्क देखील चांगले खेळताना दिसला.
सूरज चव्हाण याची बहीण सीता ही बिग बॉसच्या घरात भावाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती. आता बिग बॉसकडून मिळालेल्या पैशांमध्ये सूरज हा घर बांधणार आहे. सूरज चव्हाण याने काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात म्हटले होते की, माझे एक स्वप्न आहे की, मला माझे घर बांधायचे आहे. सूरज चव्हाण विजेता झाल्यापासून सोशल मीडियावर अनेक पोस्ट त्याच्या अभिनंदनासाठी शेअर केल्या जात आहेत.