घरातील सदस्यांनी केली थेट अंकिता वालावलकर हिची पोलखोल, म्हणाले, जशी दिसती तशी…

Bigg boss marathi 5 : बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसले. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये पोहोचले. आता फिनालेला काही तासच शिल्लक आहेत. सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांच्यापैकी एकजण बिग बॉस मराठीचा विजेता होणार असल्याचे सांगितले जातंय.

घरातील सदस्यांनी केली थेट अंकिता वालावलकर हिची पोलखोल, म्हणाले, जशी दिसती तशी...
ankita walawalkar
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 2:05 PM

6 ऑक्टोबर 2024 म्हणजेच उद्या बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले पार पडणार आहे. रितेश देशमुख धमाकेदार पद्धतीने या फिनालेला होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट पोहोचले आहेत. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. अनेक रेकॉर्ड या सीजनने ब्रेक केले. आता फिनाले वीकला सुरूवात झालीये. मात्र, फिनाले वीकला सुरूवात होऊनही घरात मोठा वाद बघायला मिळाला. अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांच्यात वाद झाला. अंकिता ही तिचे ऐकत नसल्याने कायमच अभिजीत सावंत याच्यावर चिडताना दिसते.

आता नुकताच बिग बॉसच्या घरात काही पाहुणे आले होते. यावेळी त्यांनी घरात उपस्थित असलेल्या सहा सदस्यांना काही मोठे प्रश्न विचारले. यावेळी पाहुण्यांनी विचारले की, घरातील एका अशा सदस्याचे नाव सांगा तो दिसतो तसा अजिबात नाहीये. यावर घरातील सर्व सदस्यांनी अंकिता वालावलकर हिचे नाव दिले.

घरातील सदस्यांचे म्हणणे आले की, ती जशी साधी आणि भोळी चेहऱ्यावरून दिसते तशी ती अजिबातच नाही. विशेष म्हणजे घरातील सर्व सदस्यांनी मिळून तो निर्णय घेतला. म्हणजेच काय तर जशी दिसती तशी अंकिता वालावलकर अजिबात नाहीये असे घरातील सदस्यांचे म्हणणे आले. अंकिता वालावलकर हिचे घरातील जवळपास सर्वच सदस्यांमध्ये वाद झाले आहेत.

फक्त हेच नाही तर वर्षा उसगांवकर यांच्या मागेही त्यांच्याबद्दल बोलताना अनेकदा अंकिता दिसली. अभिजीत सावंत, निकी तांबोळी, सूरज चव्हाण यांच्यासोबतही तिचे बऱ्याच मोठे वाद झाले. अंकिता वालावलकर हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता वालावलकर हिने सूरज चव्हाण यालाही अनेकदा नॉमिनेशनमध्ये टाकले.

फिनाले वीकमध्येही सूरज चव्हाण याच्यामुळे निकी तांबोळी आणि अंकिता वालावलकर यांच्यात वाद झाल्याचे बघायला मिळाले. जेवण करत असताना अन्न टेबलवर सांडल्यावरून सूरजला रागावून बोलताना अंकिता वालावलकर ही दिसली होती. त्याला काही बोलू नको आता किती दिवस राहिले आहेत हवे तर मी साफ करते असेही निकीने म्हटले होते.

अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.