Bigg Boss च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की आणि अरबाजची जोडी जमणार?

Bigg Boss Marathi Season 5 : 'सकाळी सकाळी काय आहे...', Bigg Boss च्या घरात , निक्की तांबोळी अन् अरबाजची जोडी जमणार?, 'प्रेमात असंच असतंय बिग बॉस...', सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी' च्या नव्या प्रोमोची चर्चा...

Bigg Boss च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, निक्की आणि अरबाजची जोडी जमणार?
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 11:03 AM

‘बिग बॉस’ म्हटल्यानंतर कोणची तरी जोडी जमणारच… आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या भागात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये प्रेमाचा गुलाब बहरणार का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. शिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियरला निक्की तांबोळी हिने अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुखसमोर आपण अरबाज पटेलवर फिदा झाल्याचं सांगितलं होतं. आता ‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 च्या नव्या प्रोमोमध्ये देखील असंच काही दिसून येत आहे. त्यामुळे निक्की आणि अरबाज यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सर्वत्र प्रोमोची चर्चा सुरु आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या दिवसाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये स्पर्धक आनंदी दिसत आहे. प्रोमोमध्ये सकाळी निक्की चहा बनवायला घेते. चहाचा हीटर बंद असल्यामुळे निक्की घन:श्यामला ‘बिग बॉस’ला विनंती करण्यास सांगते. त्यावेळी छोटा पुढारीने बिग बॉसकडे खास अंदाजात केलेली विनंती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

हे सुद्धा वाचा

छोटा पुढारी निक्कीचा वहिनी म्हणून उल्लेख करतो आणि म्हणतो, ‘बिग बॉस आमच्या वहिनीचं तरी ऐका…’ त्यावर अरबाज छोटा पुढारीला म्हणतो, ‘थांब रे सकाळी सकाळी कायम म्हणतो तू…’ पुढे छोटा पुढारी म्हणतो, ‘तुझं प्रेम उतू चाललंय ते सांगतोय…चहा उतू गेला, तर काही बिघडत नाही…’

छोट्या पुढारीच्या या वक्तव्यानंतर निक्की लाजते आणि हसू लागते.. पुढे छोटा पुढारी म्हणतो, ‘प्रेमात असचं असतंय ‘बिग बॉस…’, घन:श्याममुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आनंदाचं वातावरण तयार झालं. प्रोमो कलर्स मराठी वाहिनीवर शेअर करण्यात आला आहे. निक्कीच्या मनात अरबाज याच्यासाठी असलेल्या भावना आणि प्रोमोनंतर दोघांची जोडी जमणार का? अशा चर्चा तुफान रंगत आहेत.

सांगायचं झालं तर, निक्की – अरबाज यांच्यातील केमिस्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, नेटकरी मात्र छोटा पुढारी बाजी मारणार असं म्हणत आहेत. प्रोमोवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘घन:श्याम दरवडे मार्केट जाम करणार वाटतंय…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘छोटा पुढारी सगळ्यांना गोड बोलून बाजी मारतो वाटतोय’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘खूप लवकर गेम चालू झाला…’ सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी 5’ शोची चर्चा सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.