सूरज चव्हाणने अशी गोष्ट सांगितली ज्याने तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी ; म्हणाला, गावाला…

सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरलाय. विशेष म्हणजे सूरजने बिग बॉसच्या घरात धमाका केलाय. ज्यावेळी सूरज हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला त्यावेळी कोणीही विचार केला नसेल की, हा विजेता होईल. सूरज चव्हाण याला प्रेक्षकांनी अत्यंत मोठे प्रेम दिले.

सूरज चव्हाणने अशी गोष्ट सांगितली ज्याने तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी ; म्हणाला, गावाला...
Suraj Chavan
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 7:04 PM

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण हा ठरलाय. विशेष म्हणजे धमाकेदार पद्धतीने गेम खेळताना सूरज हा बिग बॉसच्या घरात दिसला. सूरज चव्हाणला लोकांनी खूप प्रेम दिले. जवळपास प्रत्येक आठवड्यामध्ये सूरज हा नॉमिनेशनमध्ये असायचा. मात्र, नॉमिनेशनमध्ये असताना देखील तो शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात टिकून होता. मुळात म्हणजे प्रचंड असा प्रतिसाद लोकांनी सूरजला दिसला. आता सूरज चव्हाण हा एक फेमस चेहरा बनला आहे. सूरज बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर आपल्या मुळगावी गेला. यावेळी गावकऱ्यांनी त्याचे जोरदार पद्धतीने स्वागत देखील केले.

नुकताच आता सूरज चव्हाण याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सूरज चव्हाण हा म्हणाला की, ज्यावेळी मला बिग बॉसच्या निर्मात्यांकडून फोन आला त्यावेळी वाटले की, आपली कोणीतरी टिंगल करत आहे आणि आपल्याला फसवत आहे. मी क्रिकेट खेळत असताना मला फोन आला होता. सुरुवातीला वाटत होतं मला जमायचं नाही.

मी दडपण घेतलं होतं घरात जायच्या आधी. तेव्हा वाटायचं कसं होईल आपलं. कोण मला समजून घेईल का. नाही घ्यायचं समजून असं वाटायचं. पण देवाच्या दयेने आणि बिग बॉसच्या घरातील लोकांनी मला समजून घेतलं. मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार जिंकणार असं वाटतच होतं. बिग बॉसच्या घरात जावे की, नाही हेच कळत नव्हते.

त्यानंतर आमचं अख्खं कुंटब बसलं आणि आम्ही बिग बॉसच्या घरात जायचं की नाही याचं डिस्कशन केलं.सूरज चव्हाण साधी सिंपल राहतो. पण कडक असतो. लोकांनी मला प्रेम दिले आणि व्होट दिले. मी त्यांचे काळजापासून आभार मानतो. पुढे गावाकडच्या पोरांना देखील सूरज चव्हाण याने अत्यंत मोठे आव्हान केले.

सूरज म्हणाला की, गावखेड्यातील पोरांना सांगतो, तुम्हाला एकच सांगतो भ्यायचं नाही कधी. करायचं म्हणजे करायचं ही जिद्द ठेवायची. आपल्याला, आपण करणार आपलं स्वप्न पूर्ण होणार हे आपल्याला माहीत आहे. आता सूरज चव्हाण याच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण याचे आयुष्यच बदलून गेल्याचे बघायला मिळतंय.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.