निकी तांबोळी हिने केला अरबाज पटेलसोबतच्या नात्यावर ‘तो’ मोठा खुलासा, थेट म्हणाली, आम्ही दोघे…
'बिग बॉस मराठी सीजन 5'ने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. विशेष म्हणजे या सीजनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन पाचचा विजेता ठरलाय. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे टॉप 2 मध्ये पोहोचले होते आणि सूरज विजेता ठरला.
‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले होऊन आता काही दिवस झाले आहेत. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता झालाय. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले. मुळात म्हणजे सुरूवातीपासूनच या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. टीआरपीमध्येही सीजन हिट ठरले. घरात मोठे हंगामे, वाद देखील बघायला मिळाले. निर्मात्यांनी अचानक निर्णय घेत जाहीर केले की, हे सीजन 70 दिवसांमध्येच संपेल. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुळात म्हणजे हिंदी बिग बॉसमुळे निर्मात्यांना असा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जाते.
बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी हे सर्वाधिक चर्चेत असणारे नाव ठरले. निकी तांबोळी ही जबरदस्त गेम खेळताना दिसली. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात निकी तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये लव्ह अॅंगल हा बघायला मिळाला. दोघेही बऱ्याचदा बिग बॉसच्या घरात रोमांटिक होताना दिसले. अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निकी तांबोळी ही ढसाढसा रडताना देखील दिसली.
निकी तांबोळी हिची आई बिग बॉसच्या घरात आली. त्यावेळी तिने अरबाज पटेल याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा केला. हेच नाही तर तिच्या आईने स्पष्टपणे सांगितले की, बाहेर अशी चर्चा आहे की, अरबाज पटेल याचा अगोदरच साखरपुडा झालाय. यानंतर निकी तांबोळी हिला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाला. निकी रडताना देखील दिसली.
अरबाज पटेल परत घरात आला आणि त्याने निकीला काही गोष्टी समजून सांगितल्या. आता नुकताच निकी तांबोळी हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना निकी दिसलीये. निकी तांबोळी म्हणाली की, मी तर अगोदरच सांगितले की, मी अरबाजच्या प्रेमात आहे. आम्ही रिलेशनमध्ये पण नाहीत…आमचे नाते मित्र मैत्रिणीच्या पुढे गेले. आम्ही सध्या एकमेकांना वेळ देत आहोत.
त्याचे आयुष्य कसे आहे माझे कसे आहे हे जाणून घेत आहोत. प्रेम तर आहे पण मैत्रिवाले आहे की, अजून काही हे मला देखील माहिती नाहीये. सध्या फक्त आम्हाला एकमेकांना अधिक वेळ द्यायचा आहे. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की, अरबाज हा खूप म्हणजे खूप जास्त चांगला व्यक्ती आहे. पहिल्यांदाच निकी तांबोळी ही अरबाजसोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना दिसली आहे.