अविनाश सचदेव-फलक नाज करणार लग्न? Bigg Boss OTT 2 च्या लोकप्रिय जोडीकडून खुलासा

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये अविनाश सचदेव आणि फलक नाज यांची जोडी खूप चर्चेत आली होती. आता बिग बॉस संपल्यानंतरही या दोघांमधील केमिस्ट्रीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

अविनाश सचदेव-फलक नाज करणार लग्न? Bigg Boss OTT 2 च्या लोकप्रिय जोडीकडून खुलासा
Avinash Sachdev and Falaq NaazImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 10:55 AM

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सिजन यंदा चांगलाच चर्चेत राहिला. या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या फलक नाज आणि अविनाश सचदेव या टीव्ही कलाकारांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. सोशल मीडियावरसुद्धा ही जोडी खूप चर्चेत होती. फलक आणि अविनाशमधील केमिस्ट्री आता बिग बॉस संपल्यानंतरही चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही या दोघांमधील मैत्री कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा खुलासा नुकत्याच एका पार्टीदरम्यान झाला. ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या सर्व सदस्यांसाठी नुकतीच एक मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये पूजा भट्ट, फलक नाज, अविनाश सचदेव यांच्यासह इतर स्पर्धकसुद्धा उपस्थित होते. सोशल मीडियावर या पार्टीतील बरेच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यादरम्यान फलक आणि अविनाश यांचासुद्धा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस ओटीजी 2’च्या स्पर्धकांसाठी आयोजित केलेल्या या खास पार्टीत फलक आणि अविनाश एकत्र एण्ट्री घेताना दिसले. यावेळी पापाराझी या जोडीला पाहून प्रश्न विचारतात की, “आता आम्ही तुमच्याकडून थेट लग्नपत्रिकेची अपेक्षा करू शकतो का?” हा प्रश्न ऐकताच फलकच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आलं. अखेर ती तोंड मागे लपवून हसू लागते. तर अविनाशसुद्धा पापाराझींच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो. दोघंसुद्धा हसत तिथून निघून जातात. सोशल मीडियावर अविनाश आणि फलक यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात असतानाही अविनाशने फलकसाठी त्याचं प्रेम जाहीर केलं होतं. मात्र त्यावेळी फलकने त्याला नकार दिला होता. आता मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू इच्छिते असं, म्हणत तिने अविनाशला नाकारलं होतं. मात्र बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे.

अविनाश याआधी अभिनेत्री रुबिना दिलैकसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अविनाश आणि रुबिना यांनी 2012 मध्ये ब्रेकअप केलं. त्यानंतर 2015 मध्ये अविनाशने ‘इस प्यार को क्या नाम दूँ?’ या मालिकेतील सहअभिनेत्री शाल्मली देसाईशी लग्न केलं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. 2019 मध्ये अविनाश हा अभिनेत्री पलक पुरस्वानीला डेट करू लागला. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये अविनाश आणि पलक एकत्र झळकले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.