Bigg Boss OTT 2 मध्ये नव्या प्रेमाची सुरुवात; मनीषा राणीने हँडसम हंकला सर्वांसमोर किस केलं, त्यानंतर…

Bigg Boss OTT 2 पुन्हा रंगणार प्रेमाच्या चर्चा... 'या' दोघांमध्ये अफेअरला होणार सुरुवात... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल... सध्या सर्वत्र 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची सुरुवात...

Bigg Boss OTT 2 मध्ये नव्या प्रेमाची सुरुवात; मनीषा राणीने हँडसम हंकला सर्वांसमोर किस केलं, त्यानंतर...
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 3:14 PM

मुंबई | अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरु झाला आहे. यंदाच्या सिझनमध्ये अनेक सेलिब्रिटी ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहेत. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी २’ची चर्चा सुरु आहे. आतापर्यंत बिग बॉसचे अनेक सिझन झाले. प्रत्येक सिझममध्ये सेलिब्रिटी एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉस शो संपल्यानंतर काही सेलिब्रिटींचं ब्रेकअप झालं, तर काहींनी मात्र लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता ‘बिग बॉस ओटीटी २’ देखील प्रेमाचा रंग बहरताना दिसत आहे. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये कोणामध्ये प्रेमाचा गुलाब फुलणार याची चर्चा सुरु असताना. एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ‘बिग बॉस ओटीटी २’चे दोन स्पर्धक त्यांच्या प्रेमामुळे चर्चेत आले आहेत.

व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस ओटीटी २’ स्पर्धक मनिषा राणी हँडसम हंक जैद हदीद याला किस करताना दिसत आहे.. व्हिडीओमध्ये मनिषा जैद हदीद याच्यासमोर मनातील भावना व्यक्त करताना दिसत आहे.. शिवाय मनिषाने सर्वांसमोर जैद हदीद याला किस केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

मनिषा तिच्या मनातील भावना व्यक्त करत असताना जैद देखील तिला विचारतो, ‘किस करायची आहे का?’ त्यानंतर मनिषा देखील सर्वांसमोर जैदला किस करते. मनिषाच्या कृतीनंतर ती घरातील सर्वात दमदार स्पर्धक ठरु शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या सर्वत्र मनिषा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

मनिषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये प्रवेश केल्यानंतर मनिषा प्रसिद्धी झोतात आली आहे. बिहारच्या मनिषाला अभिनेत्री शहनाज गिल पार्ट २ म्हणून ओळख मिळत आहे. चाहत्यांना देखील मनिषा आवडत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस ओटीटी २’शोमध्ये पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.