Bigg Boss OTT 2 | कधी किस तर कधी उघडली पँट; सेन्सॉरशिप नाही म्हणून ‘बिग बॉस’चे स्पर्धक ओलांडतायत मर्यादा?

विशेष म्हणजे या आठवड्यात त्याच्यासोबत घरातील इतर सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. जद हदिदसोबत बेबिका धुर्वे, जिया शंकर, सायरस ब्रोचा, मनिषा राणी, अविनाश सचदेव आणि फलक नाज यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.

Bigg Boss OTT 2 | कधी किस तर कधी उघडली  पँट; सेन्सॉरशिप नाही म्हणून 'बिग बॉस'चे स्पर्धक ओलांडतायत मर्यादा?
Bigg Boss OTT 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 12:17 PM

मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने पहिल्या सिझनचं सूत्रसंचालन केल्यानंतर आता दुसऱ्या सिझनसाठी सलमान खानची निवड करण्यात आली आहे. बिग बॉस आणि सलमान हे जणू समीकरणच बनलं आहे. मात्र सध्या हा शो त्यातील स्पर्धकांच्या मर्यादेपलीकडील वागणुकीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील जद हदिद आणि आकांक्षा पुरी यांच्या 30 सेकंदांच्या लिप-टू-लिप किसची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर जद हदिदने पुन्हा एका मर्यादा ओलांडली. बिग बॉसच्या घरात स्पर्धकासमोर त्याने थेट पँटच उघडली. या दोन्ही घटनानंतर सलमानने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. मात्र ओटीटीवर सेन्सॉरशिप नसल्याचा पुरेपूर फायदा हे स्पर्धक टीआरपीसाठी घेत असल्याचा आरोप प्रेक्षकांकडून होत आहे.

जद हदिदसोबतच्या किसिंग प्रकरणामुळे आकांक्षाला घरातून बाहेर पडावं लागलं. तर दुसरीकडे पँट उघडल्यामुळे जदलाही सलमानकडून बरंवाईट ऐकायला मिळालं. याची शिक्षा म्हणून त्याला या आठवड्यात नॉमिनेट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात त्याच्यासोबत घरातील इतर सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. फक्त पूजा भट्ट आणि कॅप्टन अभिषेक मल्हान हे दोघंच घरात सुरक्षित आहेत. तर जद हदिदसोबत बेबिका धुर्वे, जिया शंकर, सायरस ब्रोचा, मनिषा राणी, अविनाश सचदेव आणि फलक नाज यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

या घडामोडींसोबतच बिग बॉसच्या घरात अब्दु रोझिकची एण्ट्री झाली आहे. अब्दु हा बिग बॉसच्या घरातील जद हदिद, मनिषा राणी, अविनाश आणि जिया शंकर यांच्यासोबत मिळून व्हिडीओ अल्बम बनवणार असल्याचं म्हटलं जात आहे. जद हा दुबई स्थित मॉडेल आहे. बिग बॉसच्या घरातील वागणुकीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असंही कळतंय. एका एपिसोडमध्ये त्याने आकांक्षाला किस केलं, तर दुसऱ्या एपिसोडमध्ये त्याने जिया शंकरसमोर पँट उघडली.

बिग बॉस ओटीटीचा कंटेंट हा कौटुंबिक असण्यावर अधिक भर असेल, असं सलमानने शो सुरू होण्याआधी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र टीव्हीप्रमाणे ओटीटीला कोणताच सेन्सॉरशिप नसतो, या गोष्टीचा फायदा पुरेपूर या शोने घेतला. हीच गोष्ट सलमानला आवडली नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.