Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या स्पर्धकांकडून हद्दच पार! जिया शंकरने घेतला अभिषेकच्या हाताचा चावा, भडकले नेटकरी

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं हे वागणं अनेकदा चर्चेचा विषय ठरतोय. ओटीटीवर सेन्सॉरशिप नसल्याने टीआरपीसाठी हे स्पर्धक त्याचा पुरेपूर फायदा घेत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. याआधी बिग बॉसच्या घरात जद हदिद आणि आकांक्षा पुरीने जवळपास 30 सेकंद किस केलं होतं.

Bigg Boss OTT 2 | बिग बॉसच्या स्पर्धकांकडून हद्दच पार! जिया शंकरने घेतला अभिषेकच्या हाताचा चावा, भडकले नेटकरी
Jiya Shankar and Abhishek MalhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 9:29 AM

मुंबई | 21 जुलै 2023 : ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना दररोज नवीन काहीतरी पहायला मिळतंय. कधी घरातील स्पर्धक एकमेकांशी भांडू लागतात. तर कधी ते एकमेकांवर राग व्यक्त करताना दिसतात. बिग बॉसच्या घरात जिया शंकर आणि अभिषेक मल्हान यांच्या मैत्रीची सध्या जोरदार चर्चा आहे. चाहत्यांनी त्यांना ‘अभिया’ असं टोपणनावसुद्धा दिलं आहे. बिग बॉस ओटीटी 2 च्या नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये जिया शंकर अभिषेकला विचारते की त्याला ती हवी आहे की नको? त्यावर अभिषेक म्हणतो की याचं उत्तर तो दुसऱ्या दिवशी येईल. मात्र जियाला तेव्हाच उत्तर ऐकायचं असतं. यावेळी त्यांच्या बाजूला बसलेली फलक नाज त्यांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देते. जर अभिषेकने जियासोबत राहण्याचं ठरवलं तर बिग बॉसच्या घराबाहेर असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडचं काय होईल, असा सवाल ती करते. त्याचवेळी जिया अभिषेकच्या हातावर चावते.

अभिषेकच्या हाताला चावत जिया त्याला म्हणते, “मी माझ्या ओठांनी प्रेम दिलं.” त्यावर अभिषेकसुद्धा तिच्यासोबत फ्लर्ट करतो. “त्यापेक्षा तू मला थेट किस करू शकतेस”, असं तो तिला म्हणतो. या थट्टामस्करीत अभिषेक जियाला चिमटी काढतो. त्यानंतर जिया त्याच्या हातावर इतक्या जोरात चावा घेते, की तिच्या दातांचे निशाण दिसू लागतात. या व्हिडीओवरून आता नेटकऱ्यांनी ट्रोलिंगला सुरूवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

याआधीच्या एका व्हिडीओमध्ये जिया एल्विशच्या पिण्याच्या पाण्यात साबण मिसळते. त्यावरूनही नेटकरी चांगलेच भडकले होते. बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान जेव्हा एल्विश जियाला पिण्यासाठी पाणी मागतो, तेव्हा ती त्या पाण्यात हँडवॉश मिसळते. यावरून एल्विशचा राग अनावर होतो आणि तो तिला म्हणतो, “तुझ्या घरात हँडवॉश मिसळून पाणी पित असतील.” त्यावर जिया भडकून त्याला म्हणते, “माझ्या घरच्यांविषयी काही बोलू नकोस.”

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं हे वागणं अनेकदा चर्चेचा विषय ठरतोय. ओटीटीवर सेन्सॉरशिप नसल्याने टीआरपीसाठी हे स्पर्धक त्याचा पुरेपूर फायदा घेत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. याआधी बिग बॉसच्या घरात जद हदिद आणि आकांक्षा पुरीने जवळपास 30 सेकंद किस केलं होतं. इतकंच नव्हे तर आणखी एका एपिसोडमध्ये जदने थेट त्याची पँट काढली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.