Bigg Boss OTT 2 : महेश भट्ट, किस आणि बरंच काही… अखेर मनीषा राणी हिने सोडल मौन

Bigg Boss OTT 2 : महेश भट्ट यांनी सर्वांसमोर मनीषा राणी हिला किस केल्यानंतर माजली होती खळबळ, अखेर तिने मौन सोडलं आणि...; अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी मनीषा राणीचे कौतुक केले...

Bigg Boss OTT 2 : महेश भट्ट, किस आणि बरंच काही... अखेर मनीषा राणी हिने सोडल मौन
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 9:16 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘बिग बॉस ओटीटी २’ शोची चर्चा सुरु आहे. नुकताच शोचा फिनाले पार पडला. ‘बिग बॉस ओटीटी २’ शोची ट्रॉफी एल्विश यादव घरी घेवून गेला, तर दुसरी रपरअप मनीषा राणी ठरली आहे. मनीषा बिग बॉसमुळे तुफान चर्चेत आली आहे. पण जेव्हा बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रसिद्ध निर्माते महेश भट्ट आले होते, तेव्हा देखील शो तुफान चर्चेत आला होता. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर महेश भट्ट यांनी मनीषा राणी हिला मिठी मारली आणि तिच्या कपाळावर किस केलं. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

मनीषा हिला किस केल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी महेश भट्ट यांना ट्रोल केलं होतं. यावर अखरे मनीषा राणी हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘टीव्ही ९’ डीजीटलसोबत संवात साधताना मनिषा हिने महेश भट्ट आणि किस प्रकरणावर मौन सोडलं असून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे…

मनीषा राणी म्हणाली, ‘महेश भट्ट माध्या वडिलांप्रमाणे आहेत. जेव्हा ते बिग बॉसमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी प्रत्येक स्पर्धकासोबत संवाद साधला.. प्रत्येकाला त्यांनी प्रेम आणि आशीर्वाद दिले. म्हणून त्यांच्याबद्दल वाईट बोलणं योग्य नाही.. महेश भट्ट यांच्यासाठी आम्ही मुलं होतो. त्यांनी माझ्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम केलं… एक वडील मुलीला मिठी मारू शकतो.. किस करु शकतो…’

पुढे मनीषा म्हणाली, ‘महेश भट्ट यांनी मला मार्गदर्शन केलं. जेव्हा मी त्यांना भेटली तेव्हा त्यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीला पाहून घाबरले होते, लोकांना वाटलं असेल की मी अस्वस्थ आहे. पण मला सांगायचं आहे की, फक्त मीच नाही तर सगळेच त्याचा आदर करतात.’

मनीषा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिची बोलण्याची स्टाइल, तिचा डान्स, तिचे डायलॉग सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. महेश भट्टच नाही तर आलिया भट्टपासून रकुलप्रीतपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी मनीषा राणीचे कौतुक केले होते… सध्या सर्वत्र मनीषा राणी हिची चर्चा रंगत आहे.

बिग बॉस ओटीटी २ शोचा विजेता

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणाऱ्या स्पर्धकाने ट्रॉफी जिंकली. युट्यूबर एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी 2 चं विजेतेपद जिंकलं. घरात एण्ट्री करताच एल्विशने आपली दमदार खेळी दाखवली. बिग बॉसच्या घराबाहेरही एल्विशला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.