‘घटस्फोट माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट…’, ११ वर्षांचं नातं तुटल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीकडून खंत व्यक्त
मोठ्या उत्साहात लग्न तर केलं, पण लग्नाच्या ११ वर्षांनंतर असं काय झालं, ज्यामुळे 'या' अभिनेत्रीने घेतला घटस्फोटाचा निर्णय; घटस्फोटाबद्दल खंत व्यक्त करत म्हणाली...
मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असतात. झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोटाचा निर्णय घेत आयुष्यात नवा मार्ग निवडला. अभिनेत्री आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये पूजा प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करताना दिसत आहे. सध्या ‘बिग बॉस ओटीटी २’ ची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. शोमध्ये अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबद्दल कायम धक्कादायक गोष्टी सांगताना दिसत आहे. आता पूजा हिने लग्न आणि घटस्फोटाबद्दल स्पर्धक जिया शंकर हिला सांगितलं आहे. सध्या सर्वत्र पूजा हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
‘बिग बॉस OTT 2’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पूजा भट्ट जिया शंकरसोबत तिच्या ११ वर्षांच्या तुटलेल्या लग्नाबद्दल बोलताना दिसली. नात्यात येत असलेल्या अडचणींमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाचा काळ अभिनेत्रीसाठी प्रचंड वाईट होता. पूजा म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ तो होता जेव्हा मी लग्नाच्या ११ वर्षानंतर माझ्या पतीला घटस्फोट दिला आणि तो पूर्णपणे माझा निर्णय होता’
पुढे पूजा म्हणाली, ‘मी याठिकाणी खोटं बोलू शकत नाही. कारण नातं कायम ठेवणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, माझी इच्छा नव्हती. मी म्हणाली मला माझं आयुष्य आरामात जगायचं आहे, की माझं १० ते ११ वर्षे जुने नातं जपायचे आहे. माझा नवरा वाईट माणूस नाही. आमच्यामध्ये जे काही होते ते सर्व चांगलं होते. पण कालांतराने मला वाटू लागलं मी स्वतःला गमावलं आहे आणि ते कोणासाठी देखील चांगलं नाही…’
‘मला स्वतःला पुन्हा मिळवायचं होतं. घटस्फोट माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.’ असं देखील पूजा म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा भट्ट हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. पूजा भट्ट कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील पूजा कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. पण पूजा फक्त सोशल मीडियावर पोस्टमुळे नाही तर, वादग्रस्त प्रकरणांमुळे देखील चर्चेत असते.