मुंबई : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी २’ (Bigg Boss OTT 2) शोची चर्चा सुरु आहे. शोचा होस्ट अभिनेता सलमान खान असल्यामुळे ‘बिग बॉस ओटीटी’ची चर्चा तुफान रंगत आहे. जियो सिनेमावर ‘बिग बॉस ओटीटी’ प्रेक्षकांना लाईव्ह पाहता येत आहे.. बिग बॉसच्या यंदाच्या पर्वात स्पर्धक त्यांच्या खेळीमुळे चर्चेत आहे. पण घरातील एक स्पर्धक त्याच्या वागणुकीमुळे घरा बाहेर आल्याची चर्चा रंगत आहे. सोशल मीडिया स्टार प्रकाश कुमार उर्फ पुनीत सुपरस्टार शोमधून बाहेर आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पहिल्याच दिवशी पुनीत सुपरस्टार घराबाहेर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर पुनीत सुपरस्टार याने ‘बिग बॉस १६’ विजेता एमसी स्टॅन याच्यावर निशाणा साधला आहे.
बिग बॉस ओटीटीच्या घरात पुनीत सुपरस्टारच्या वागण्यामुळे घरातील सदस्य त्रासले होते. त्यानंतर एकाच दिवसात बिग बॉसने घरातील सदस्यांचं मत घेत पुनीत सुपरस्टारला घराबाहेर काढलं. घराबाहेर करण्यात आल्यामुळे पुनीत इन्स्टाग्रामवर सक्रिय असून एमसी स्टेनविरोधातही वक्तव्य करत आहे.
पुनीतचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये पुनीत रॅपर एमसी स्टॅन याच्यावर निशाणा साधत आहेत. पुनीत म्हणतो, ‘एमसी स्टॅन याला गरीब मुलांची हाय लागेल.. जे पैसे मी बिग बॉसच्या माध्यमातून कमावले असते, ते मी गरीब आणि अनाथ मुलांमध्ये दान केले असते. एमसी स्टॅन याने माझ्या कॉमेडीला क्रिंज म्हणून सांगितलं. त्यामुळे एमसी स्टॅन याला त्या गरीब मुलांची हाय लागेल, ज्यांना दान करणार होतो…’ असं पुनीत म्हणाला.
सध्या सर्वत्र पुनीत आणि त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. त्याच्या व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यापासून सोशल मीडिया स्टार पुनीत इन्स्टाग्राम सक्रिय आहे.. ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये मिळालेल्या अपयशाला एमसी स्टॅन जबाबदार असल्याचा दावा पुनीत करत आहे…
‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये अपयश मिळालं असलं तरी अभिनेता सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चेत आहे . एवढंच नाही तर, त्याच्या चाहत्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. इन्स्टाग्रावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या देखील फार वाढत आहे. इन्स्टाग्रामवर पुनीतचे फोलोवर्स 1.6 मिलियनच्या देखील पुढे गेले आहेत. सध्या सर्वत्र पुनीत याची चर्चा रंगत आहे.